जागतिक परिचारिका दिवस साजरा : जगातील प्रथम महिला परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा आज वाढदिवस - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जागतिक परिचारिका दिवस साजरा : जगातील प्रथम महिला परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा आज वाढदिवस

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 

रूग्णांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांचं जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. पण अशातही स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून रूग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची मात्र धडपड सुरू असते असे प्रतिपादन डॉ. लहू कुळमेथे यांनी स्थानिक ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे आयोजित जागतिक परिचारिका दिवस कार्यक्रमात केले. 


दरवर्षी 6 ते 12 मे हा आठवडा संपूर्ण जगभरात जागतिक परिचारिका आठवडा म्हणून साजरा करतात. रूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम परिचारीका करीत असतात. त्यांना कशाचीही तमा नसते ना वेळेची त्यांना पर्वा नसते, स्वताच्या सुखदुःखाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात. या रूग्णसेवेला खऱ्या अर्थानं सुरूवात केली ती फ्लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेनं. 12 मे 1820 ला फ्लॉरेन्स यांचा जन्म झाला. 

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्लॉरेन्स यांनी जखमी सैनिकांची सुश्रुषा केली. आणि संपूर्ण जगाला त्यांनी रूग्णसेवेचा पायंडा घालून दिला. यातूनच आपल्यातल्या काही भगिनींना रोजगाराची संधी मिळेल या उद्देशानं 1860 साली लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना केली. दिवा घेतलेली 'स्त्री' असंही फ्लॉरेन्स यांच्याबाबतीत म्हटंलं जातं. त्यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्व प्राप्त झालं.

ग्रामीण रुग्णालयात जगातील प्रथम महिला परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या वाढदिवस प्रतिमेला हार, पुष्प अर्पण करून रुग्णांना फळे वाटप करून  साजरा करण्यात आला. 


यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू कुळमेथे, डॉ. अनिता अरके, डॉ. संदीप बांबोळे, डॉ. अमित चिंदमवार, डॉ. इरशाद शेख, डॉ. माया गायकवाड, डॉ. समरीन शेख, डॉ. सुरेंद्र डुकरे, अधि. परिचारिका रिता रॉय, शैला कोपुला, प्रियंका रघाताटे, सुचिता शेंडे, सुप्रिया काकडे, रोशनी नगराळे, प्रितु झाडे, सपना आटोळे, माधुरी बोरकुटे, कर्मचारी छाया मडावी, मंदाबाई टेकाम, कार्तिक निखाडे, अवताडे आदी उपस्थित होते.