नवदाम्पत्याकडून सार्वजनिक वाचनालयाला भेट - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नवदाम्पत्याकडून सार्वजनिक वाचनालयाला भेट

Share This
खबरकट्टा / सामाजिक :

खुशाल गणपतराव अडवे या युवकाने स्वतःच्या रेशीमगाठीत आजी-आजोबांची दखल घेतली होती,त्याच बरोबर १० मे ला खुशालचा शिवविवाह पुजा गोवर्धन रासेकर यांच्याशी संपन्न झाला. 


या जोडप्याने शिवविवाह सोहळ्यात आजी-आजोबांच्या फोटोला माल्यार्पण करून राजुरा येथील स्थानिक जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाला पाच हजार रूपये भेट स्वरूपात देऊन समाजात आदर्श निर्माण करून दिला,वाचनालयात पुस्तकांची व वाचकांची संख्या वाढविण्याकरीता खुशाल व पुजा या नवदाम्पत्यांनी उचललेले हे एक पाऊल आहे,यांनी दिलेल्या या भेटीतून समाजात पुन्हा खुशाल सारखा युवक आदर्श घडत राहील यात तिळमात्र शंका नाही,या शिवविवाह सोहळ्याची प्रस्तावना वामन साळवे यांनी तर सहकार्य राजू भोयर व आदित्य आवारी यांनी केले.