इंफट जिसस पब्लिक स्कूलचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

इंफट जिसस पब्लिक स्कूलचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

इंफट जिसस पब्लिक स्कूलचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचा  अटक पूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला.


इंफट जिसस पब्लिक स्कूलमध्ये  अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. या प्रकरणात संस्थाध्यक्ष सुभाष धोटे, काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बाळू धानोरकर  हे,  पैसे मिळतात म्हणून  आदिवासी मुली तक्रारी दाखल करीत आहे. असे वादग्रस्त विधान केले. त्यांचे विधानाने संतप्त झालेले आदिवासी कार्यकर्ते  कमलेश आत्राम यांनी रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती या तक्रारी वरून  रामनगर पोलिसांनी सुभाष धोटे व इतर यांचे विरोधात  अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.  सुभाष धोटे यांनी आज अटकपूर्व जामिनासाठी आज जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्याने सुभाष धोटे यांना धक्का बसला आहे. तक्रारकर्ते कमलेश आत्राम आज कोर्टात हजर होते कोर्टाने त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले.