पंतप्रधान,राज्याचे मुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री,गडचिरोलीचे पालकमंत्री यांनी जांभूळखेडा येथील घटनेचा केला निषेध. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पंतप्रधान,राज्याचे मुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री,गडचिरोलीचे पालकमंत्री यांनी जांभूळखेडा येथील घटनेचा केला निषेध.

Share This
 खबरकट्टा /गडचिरोली : 

कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात खाजगी वाहन चालकासह, पंधरा सी – 60 चे जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरात तीव्र निषेध होत असून जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. 


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून असे भ्याड हल्ले करणाऱ्या नक्षलवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सरकार सोडणार नाही असे म्हटले आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा तीव्र निषेध करीत शहीद जवानांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. 

राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनेचा तीव्र निषेध करताना म्हटले आहे की सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडत असण्याचा सपाट असून केल्यामुळेच नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले.

गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात हे स्वतः सहभागी असल्याचे म्हटले आहे. 

ऊल्लेखनीय असेे की टी.सी.ओ.सी.अर्थात ” टैैैैक्टिकल काउंटर ऑफेंसिव कैम्पेन “प्रणाली अंतर्गत कॉल एम्बुश रचून नक्षलवाद्यांनी हा घातपात घडवून आणला असे प्राथमिक दृष्ट्या दिसुन येत आहे. तब्बल 9 वर्षानंतर. नक्षलवाद्यांनी हा मोठा घातपात घडवुन आणला सीटीओटी अंतर्गत नक्षलवादी छोटी-मोठी जाळपोळ अथवा एखादी हत्या घडवुन आणून पोलीसांना घटनास्थळाजवळ बोलावून आणणे व त्याचवेळी भूसुरूंग विस्फोट घडवून हिंसा करणे असा प्रकार केला जातो. 

सीटीओटी अंतर्गत नक्षलवादी केवळ एकच सापळा रचत नाहीत तर एकाचवेळी जवळजवळ 4 ते 5 सापळे रचून लक्ष्य साधण्याचा प्रयत्न करतात. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात नक्षली हिंसाचाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असुन सर्वस्तरावर निषेध करीत शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली जात आहे .ऊद्या सर्व शहीदांना अंतिम सलामी देण्यात येइल.