"राजुरा नगराध्यक्षाना स्त्रियांच्या सन्मानापेक्षा ध्वजारोहनाच्या मानाची आठवण : संतप्त दुर्गा" रस्त्यावर :वाढत्या उन्हात महिला पायदळ, नगराध्यक्षाना विशेष सुविधा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"राजुरा नगराध्यक्षाना स्त्रियांच्या सन्मानापेक्षा ध्वजारोहनाच्या मानाची आठवण : संतप्त दुर्गा" रस्त्यावर :वाढत्या उन्हात महिला पायदळ, नगराध्यक्षाना विशेष सुविधा

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :(विशेष प्रतिनिधी-राजुरा):

एक मे "महाराष्ट्र दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा जरी होत असला तरी विदर्भात आणि त्यातही राजुरा शहरात मात्र येथील बहुतेक राजकारणी आणि नागरिक त्याला काळा दिवस म्हणून पाळतात. त्यातच आजच्या या दिवसाचे दुसऱ्या वैशिट्याकडे संपूर्ण राजुरा वासियांचे लक्ष होते कारण, त्याचे कारणही तसेच होते.

संपूर्ण महाराष्ट्रात आणि आता तर संपूर्ण देशात गाजत असलेल्या येथील 'खाजगी आदिवासी वसतिगृहातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण'  प्रकरणाचा वणवा प्रत्येक माणसाच्या मनात पेटत असतांना आता पर्यंत मूग गिळून बसलेले संस्थेचे सचिव आणि नाईलाजाने या शहराचे शेवटचे (प्रथम चा मान लोकांनी त्या दिवशीच काढलाय) नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असल्याचे मेसेज काल पासून सोशल मीडियावर येत होते. 

ज्याच्या संस्थेत इतकी मोठी घटना घडली तेव्हा पासून तोंड लपवीत फिरत असलेल्या या शेवटचा नागरिकाने साधा "ब्र" सुद्धा काढला नाही. सदर ध्वजारोहण या  शेवटच्या नागरिकाचा हस्ते होऊ नये म्हणून शेकडो संतप्त महिलांनी आज सकाळीच ध्वजारोहणाचा ठिकाणी कूच केले. संतप्त महिला येत असल्याची कुणकुण लागताच मुख्य गेट जवळ पोलिसांकरवी महिलांना थांबवून ध्वजारोहण करण्यात आले. 


यावेळी संतप्त महिला शेवटच्या नागरिकांविषयी नारेबाजी करीत होत्या. स्त्री शक्तीचा संताप आणि रोष पाहून ध्वजारोहणा नंतर ठाणेदारांनी पोलीस बंदोबस्त देऊन शेवटचा नागरिकाला त्याचा घरापर्यंत नेऊन सोडून दिले व संतप्त महिलांना पोलीस स्टेशन येथे बोलविले. 


त्या नगर परिषद ते पोलीस स्टेशन पर्यंत पायदळ गेल्या. पोलीस स्टेशन जाते वेळी सुद्धा "संतप्त दुर्गा" नारेबाजी करीत होत्या. यावेळी पोलिसांची चांगलाच दमछाक झाली. एकीकडे उष्णतेचा पारा ४८ अंशावर येवून ठेपला असून त्यात अश्या  संस्थेच्या नीच  सचिवाच्या  निर्लज्ज प्रकारामुळे आता शहरातील इतर महिला व नागरिकांचेही डोके  तापले आहे.