अखेर गोंडपिपरी येथील 97.55 लक्ष कामाच्या तात्काळ (7 दिवसाचे आत )चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : सर्वप्रथम खबरकट्टा व मनसे ने केली होती तक्रार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर गोंडपिपरी येथील 97.55 लक्ष कामाच्या तात्काळ (7 दिवसाचे आत )चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : सर्वप्रथम खबरकट्टा व मनसे ने केली होती तक्रार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (इम्पॅक्ट बातमी ):

गोंडपिपरी नगर पंचायतीच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी शासनाने दिलेल्या 10 कोटी विशेष निधीअंतर्गत 8मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार शिल्लक निधी रुपये 97,55,000/- च्या विविध कामांची निविदा न काढता कामे सुरु करून नित्कृष्ट दर्जाची होत असल्याने त्याची तात्काळ संपूर्ण चौकशी करून सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंडपिपरी चे दोषी अधिकारी व संभंधित नगर सेवक यांचेवर शिस्तभंगाची व सदस्यत्व रद्द करण्याबाबत कारवाही करण्याबाबतची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर  जिल्हा संघटक श्री राजू कुकडे व टीम खबरकट्टा ने 2 एप्रिल 2019 व 3मे 2019 च्या तक्रार निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. 


या तक्रारींवर तात्काळ जिल्हाधीकार्यांनी लक्ष घालून आर्थिक अनियमितता सुद्धा तपासण्याचे आश्वासन टीम खबरकट्टा ला दिले होते. सोबतच गोंडपिपरी च्या नगराध्यक्षा सौ सपना साखलवार यांचे  सहित सहा नगरसेवकांनी सुद्धा 3 मे  2019 ला जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यालयी भेट घेऊन तात्काळ चौकशी करण्याची विनंती केली होती. 

या सर्व घडामोडींची दखल घेत जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी दिनांक 8मे 2019 ला अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर यांना खालील बाबींवर 7दिवसाचे आत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

1)आदर्श आचारसंहितेचा भंग झाले आहे का?  2)निविदा प्रक्रिया आवश्यक आहे का?  
3)नगर पंचायत ठरावानुसार काम सुरु आहे का?      4) नगर सेवकांचे संबंध आहे काय?

या बाबतचे पत्र मुख्याधिकारी गोंडपिपरी यांना प्राप्त झाले असून चौकशीअंति काय पुढे येणार याकडे सर्व गोंडपिपरी नगर वासियांचे लक्ष वेधले आहे.