3महिने लोटूनही कापसाचे चुकारे मिळाले नाही : नंदविजय जिनींग च्या हरमन कोटेक्स च्या दलालाचा प्रताप : पीडित शेतकऱ्याचा आरोप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

3महिने लोटूनही कापसाचे चुकारे मिळाले नाही : नंदविजय जिनींग च्या हरमन कोटेक्स च्या दलालाचा प्रताप : पीडित शेतकऱ्याचा आरोप

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - 

कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथील मारोती लटारी बोबडे या शेतकऱ्याने 5मार्च 2019 रोजी गाडी क्रमांक AP02 W392 या गाडीने 58क्विंटल 5किलो कापूस भरून नंदविजय जिनींग मध्ये हरमन कोटेक्स या व्यापाऱ्याला गणेश काकडे या दलालामार्फत माल विकल्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती ची वजन पट्टी व साधी चुकारा पट्टी 3,12,599 रक्कम देणे बाकीची पट्टी देण्यात आली व चार दिवसांनी पैसे देण्यात येईल असे सांगितले.परंतु चार दिवस नंतर आज देऊ उद्या देऊ असे म्हणत तीन महिने निघून गेले तरी मला 58 क्विंटल ची रक्कम मिळाली नाही.शेवटी हतबल होऊन मी दिनांक 25 मे 2019 ला पोलीस ठाणे कोरपना येथे भादंवि 465 अंतर्गत गणेश गिरीधर काकडे यांचे विरुद्ध एन सि आर दाखल केली आहे.- मारोती बोबडे - पीडित शेतकरी, सोनुर्ली. 
  
यापूर्वीही शेतकऱ्याने सहाय्य्क निबंधक कोरपना व कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे कडे तक्रार दिली परंतु रक्कम मिळाली नसल्याचे आज चंद्रपूर  पत्रकार परिषद येथे माहिती दिली.