खबळजनक : गोंडपिपरी येथे मतिमंद युवकावर लैगिंक अत्याचाराची घटना सी सी टीव्ही द्वारे उघड : कलम 377अन्वये गुन्हा दाखल : आरोपी फरार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खबळजनक : गोंडपिपरी येथे मतिमंद युवकावर लैगिंक अत्याचाराची घटना सी सी टीव्ही द्वारे उघड : कलम 377अन्वये गुन्हा दाखल : आरोपी फरार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी प्रतिनिधी :

गोंडपिपरी शहरातील एका प्रतिष्ष्ठीत गणल्या जाणाऱ्या व्यापारी परिवारातील मतिमंद असलेल्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची खबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. 


सविस्तर वृत्त असे की शहरातील 22 वर्षीय युवकाच्या वडिलांनी आपल्या प्रतिष्ठान व घरी लावलेल्या सी सी टीव्ही कॅमेऱ्याच्या चित्र फिती आधारे (काल दिनांक 3 मे 2019 रात्री 8:30वाजताच्या )आपल्या मुलावर लैगिंक अत्याचार झाल्याची पोलीस ठाणे गोंडपिपरी येथे तक्रार दिली असून वृत्त लिहेपर्यंत आरोपी अनिल देवाजी कुळमेथे (वय 30),रा. गोंडपिपरी हा अद्याप फरार असून पोलीस ठाणे गोंडपिपरी अंतर्गत अधिक तपास सुरु आहे.
--------------------------------------------------------------------
काय आहे कलम 377 :

भारतीय दंड संहिता कलम 377 नुसार ‘अनैसर्गिक संभोग’ हा गुन्हा ठरतो. या कलमाअंतर्गत दोषी ठरल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी तरतूद आहे.