सिपेट चंद्रपूर च्या वसतिगृहात 22 ते 25 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा : उपचारांती सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिपेट चंद्रपूर च्या वसतिगृहात 22 ते 25 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा : उपचारांती सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -

सिपेट (सेंटर फॉर स्कीलिंग एन्ड टेक्निकल सपोर्ट) ह्या सेंटरचे कार्यालय तीर्थरूप नगर येथे सुरू आहे, युवकांना स्वयं रोजगाराचे धडे देत त्यांना सक्षम बनविण्याचे काम सिपेट द्वारे होत आहे,23 मे च्या रात्री सिपेटच्या सिव्हिल लाईन परिसरात असलेलं वसतिगृहात 22ते 25 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली.


काल रात्री अचानक सर्व विद्यार्थ्यांना पोटदुखी व उलटीचा त्रास सुरू झाला, वसतिगृह येथे असलेले वार्डन यांनी तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून विषबाधा नेमकी कशी झाली उघडकीस यायचे आहे.


याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी अनेक समस्या मांडल्या जसे  वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चांगलं जेवण, पाण्याची व्यवस्था, वसतिगृहात पंख्याची व्यवस्था नाही.तरी या सर्व व्यवस्था त्वरित देण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे