1 जून ला गडचांदूर येथे भव्य रक्तदान शिबिर : समाजसेवक डॉ.गिरीधर काळे मित्रमंडळाचे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

1 जून ला गडचांदूर येथे भव्य रक्तदान शिबिर : समाजसेवक डॉ.गिरीधर काळे मित्रमंडळाचे आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. गिरीधरभाऊ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी 1 जूनला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गडचांदूर येथे डॉ.जयदीप यादवराव चटप यांचे चटप क्लीनिक परिसरात सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. 


समाजसेवक डॉ.गिरीधर काळे मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.योगेश सालफळे राहतील. उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, पंचायत समिती सदस्या सविता काळे, ठाणेदार सुनीलसिंग पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.धर्मेंद्र सुलभेवार, माजी पं.स. सदस्य यादवराव चटप, सामाजिक कार्यकर्ते डॉ.सचिन मेश्राम, रक्तदूत मंगेश पाचभाई, अभिनय किनेकर, हाकिम हुसेन उपस्थित राहतील.

समाजसेवक डॉ गिरीधर काळे बिबी येथे मागील 30 वर्षांपासून अस्थीरुग्णांवर निशुल्क सेवा करीत आहे. आजतागायत चार लाखांहून अधिक हाडाच्या रुग्णांवर उपचार करून त्यांनी बरे केले आहे. ग्रामसभेने त्यांना 'डॉक्टर' ही ऐतिहासिक उपाधी देऊन सन्मानित केले. राज्य व देशभरातील रोज शेकडो अस्थीरुग्णांवर उपचार करणारे डॉ.काळे यांनी विदेशातील रुग्णांनाही सेवा दिली आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम म्हणून रक्तदानाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन  समाजसेवक डॉ.गिरिधर काळे मित्रमंडळातर्फे मनोज भोजेकर, दीपक चटप, अविनाश पोईनकर, सुकेश ठाकरे, मयुर एकरे, रत्नाकर चटप, पुरुषोत्तम निब्रड, हबीब शेख, महालिंग कंठाळे, डॉ.शैलेश विरुटकर, सतीश जमदाडे, दीपक खेकारे, रोशन आस्वले, प्रविण काकडे, विकी उरकुडे, सतीश पाचभाई, चंदु झुरमुरे, मंगेश माहुरे, वैभव राव, सुयोग कोंगरे, संतोष निखाडे, श्रीकांत मोहारे, साहिल थिपे, लक्ष्मण कुडमेथे, महेश देरकर आदी मित्रमंडळींनी केले आहे.