कॉंग्रेस नेत्‍यांची बेताल वक्‍तव्‍ये विकृत मानसिकतेचे निदर्शक – अंजली घोटेकर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कॉंग्रेस नेत्‍यांची बेताल वक्‍तव्‍ये विकृत मानसिकतेचे निदर्शक – अंजली घोटेकर

Share This
-भाजपा तर्फे कॉंग्रेस नेत्‍यांच्‍या विरोधात तिव्र निदर्शने
खबरकट्टा / चंद्रपूर :

राजुरा येथील इन्‍फन्‍ट जिजस शाळेतील आदिवासी विद्यार्थींनीवरील अत्‍याचार प्रकरणी कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष व संस्‍थेचे अध्‍यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी निर्लज्‍जपणे केलेले वक्‍तव्‍य व आमदार विजय वडेट्टीवार व बाळु धानोरकर यांनी त्‍या वक्‍तव्‍याचे केलेले समर्थन यातुन कॉंग्रेसचा खरा चेहरा उघडकीस आला आहे. 


मुळात स्त्रियांचा सन्‍मान न करणे हीच भुमिका आजवर कॉंग्रेसने घेतली आहे. अल्‍पवयीन मुलींवर झालेल्‍या अत्‍याचार प्रकरणी पालक केवळ मदतीच्‍या लालसेने अत्‍याचार झाले असे सांगण्‍यास सरसावले असे म्‍हणणे म्‍हणजे कॉंग्रेस नेत्‍यांच्‍या विकृत मानसिकतेचे निदर्शक असल्‍याची टिका महापौर अंजली घोटेकर यांनी केली.

आज दि. 23 एप्रिल 2019 रोजी गांधी चौक चंद्रपूर येथे भाजपा तर्फे निदर्शने करत  माजी आमदार सुभाष धोटे, आमदार विजय वडेट्टीवार, बाळु धानोरकर यांचा निषेध करण्‍यात आला. 

यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी निषेधाचे फलक फडकवत कॉंग्रेस नेत्‍यांच्‍या विरोधात जोरदार नारेबाजी केली. यावेळी जिल्‍हा परिषदेचे देवराव भोंगळे, आ. नानाजी शामकुळे, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरिश शर्मा, आमदार संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपाचे स्‍थायी समितीचे सभापती राहुल पावडे, संदिप आवारी, पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अल्‍का आत्राम, भाजपा आदिवासी आघाडीचे नेते वाघुजी गेडाम, शिला चव्‍हाण, अनुराधा हजारे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.