विरूर येथे अवैध गौ तस्करीचा भांडाफोड: ठाणेदार तिवारी यांची धडक कारवाही - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विरूर येथे अवैध गौ तस्करीचा भांडाफोड: ठाणेदार तिवारी यांची धडक कारवाही

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा -ग्रामीण ):

काल दिनांक 19एप्रिल 2019 रोजी मु. पो. विरुर, तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे पोलिस इन्स्पेक्टर श्री तिवारी तर्फे तीन ट्रक भरून 150 च्या पेक्षा अधिक अवैध गौ तस्करी पकडली असून तस्करांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

या सर्व गौ माता आणि बैल सायंकाळी ७ वाजता लोहाराच्या गौ शाळा, चंद्रपूर येथे स्थानांतरित करण्यात आले.


अनेक  बैल आणि गाई या तस्करी मध्ये ट्रक मध्ये कोंबून ठेवल्या मुळे मरण पावल्या,ही जनावरे  अतिशय अशक्त आणि कमजोर अवस्थेत सापडली असून  ,त्यांच्या शरीरावर अतिशय गंभीर अश्या जखम आढळल्या असून  अनेकांना योग्य वेळेवर उपचार आणि देखरेख केल्या मूळे त्यांना वाचविण्यात यश आले.

लोकमान्य टिळक विद्यालय मित्र परिवार चंद्रपूर चंद्रपूरचे अमित भारद्वाज, धीरज देठे, निलेश रेभणकर आणि अॅड. आशिष मुंधडा यांनी कार्यकर्त्यांनी वेळे वर पोहचून गौ माता च्या संरक्षणाचे आणि देखरेख चे कार्य संपन्न केले.