उष्णमहालाटीच्या दिवसात नेचर इनवारमेन्ट वाइल्ड लाइफ ऑर्गनायझेशन (न्यू ) गडचांदूर तर्फे पक्षासाठी पाणवठे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उष्णमहालाटीच्या दिवसात नेचर इनवारमेन्ट वाइल्ड लाइफ ऑर्गनायझेशन (न्यू ) गडचांदूर तर्फे पक्षासाठी पाणवठे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :( गडचांदूर-नांदा प्रतिनिधी ):

उष्ण महालाटीच्या ऋतूला सुरवात झाली आहे,जिल्यात तापमान 46℃ च्या वर गेले आहे थंडगार पाण्याची अपेक्षा सर्वांनाच असते मानवाला पाण्यासाठी वणवण करावि लागते तर यापेक्षा अधिक  पक्षांना सुद्धा पाण्यासाठीसाठी भटकंती करावी लागते  , वाढत्या प्रदूषणामुळे व तापमानाने दिवसेंदिवस पक्षाचा किलबिलाट व पक्षाची संख्या कमी होत आहे ,प्रदूषण आणि पर्यावरण असंतुलनाने मानव घटकाबरोबर  पक्षांना यांचे परिणाम भोगावे लागत आहे, पाण्याअभावी कित्येय पक्षांना जीव गमवावा लागत आहे.


धगधग्या उनाच्या दिवसात पक्षाना जीवाची लाही लाही करून वन्य पशुना गतप्राण होऊ नये  यासाठी नेचर इनवारमेन्ट वाइल्ड लाइफ ऑर्गनायझेशन गडचांदूर संस्थेचे सचिव लिलाधर मत्ते , सुयोग भोयर , यांच्या संकल्पनेतून  पक्षी प्याऊ उपक्रमात सुरवात करण्यात आली , या उपक्रमात त्यांचे  मित्रांनी सुद्धा सहकार्य केले त्यात ,आकाश नामेवार , नीतेष शेंद्रे ,भूषण झाडे,संकेत लांडे ,ठानेशवर मत्ते, केतन झाडे, सागर ठाकरे , दत्तू पानघटे ,जय,  ,आकाश गायकवाड  इतर उपस्तीत होते .  "शहरात झाडवर पक्षी प्याऊ बांधून पक्षांना पाण्याची वेवस्था केली आहे , गेल्या चार वर्षा पासून  हा उपक्रमात उनाड्यात मध्ये राबवला जात आहे  ,नागरिकांनी सुद्धा वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे संत तुकाराम महाराजांनी गायलेल्या अभंगातून वृक्ष, पशुपक्षी ,याची महती गायली आहे त्याला अनुसरून व वाढत्या प्रदूषण आणि तापमान लक्षात घेता हा उपक्रम राबविण्यात यावा पक्षी वाचवा पर्यावरण वाचवा   असा संदेश  लिलाधर मत्ते  यांनी नागरिकांना दिला आहे. 

नेचर इनवारमेन्ट वाइल्ड लाइफ ऑर्गनायझेशनच्या वन्यजीव व पक्षीसंवर्धनाचे कौतुक केले जात आहे.