चंद्रपूर वासियांचे पाण्यासाठी भीक मांगो आंदोलन : पाईपलाइन दुरुस्तीसाठी उपआयुक्त यांना दिले भीक मागुण जमा केलेले पैसे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर वासियांचे पाण्यासाठी भीक मांगो आंदोलन : पाईपलाइन दुरुस्तीसाठी उपआयुक्त यांना दिले भीक मागुण जमा केलेले पैसे

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर 

उन्हाळ्या आला कि , सर्वत्र पिण्याच्या पाण्याची समस्या  निर्माण होत असते ग्रामीण भागात तर सर्वाधिक  असते पण या वर्षी चंद्रपुर शहर महानगर पालिकेच्या भोंगळ कार्यभारामुळे चंद्रपुर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी निर्माण झालेली आहे.


काही दिवसापुर्वी चंद्रपुर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील सुज्ञ नागरीक चंद्रपुर मनपा च्या  आयुक्त संजय काकडे व पाणी पुरवठा कंत्राटदार यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली व या समस्या वरती मनपा  आयुक्त यांनी पुर्ण पणे निवारण करण्याची हामी पण दिली पण आठ दिवस लोटून न ही बालाजी वार्डातील नागरिकांची समस्या जैसे थे राहीली.
  
म्हणून आज दिनांक 20 एप्रिल रोजी वार्डातील नागरिकांनी भीक मागो आंदोलन करून  नारे लावत चंद्रपुर महानगर पालिकेच्या  आयुक्त संजय काकडे यांना निवेदन देण्यात आले.  या आंदोलनात संपुर्ण वार्ड वासी शामिल झाले होते . यांच्या मुख्य मागण्या ह्या कि , वार्डातील मुख्य पाईप लाइन मधून खोदकाम करून नवीन पाईपलाईन टाकून नृतनी करणे करने ही मागणी पुर्ण न केल्यास येतं  आठ दिवसात वार्डातील महिला झोन अभियंता व कंत्राटदार यांच्या हातात बागळ्याच्या च्या  अहिर भेट सोरूपात दिल्या जाण्याची माहिती येथील आंदोलन कर्ता नी दिली.


चंद्रपुर महानगर पालिकेच्या हा भोंगळ कार्यभार पाहुन आंदोलन कर्तानी भीक मागुन गोळा केलेल्या पैसे  उपायुक्त यांना भेट सोरूप देउन पाण्याची पाईपलाईन दूरस्थी न केल्या गेल्यास  येणार्या वर्षाचं घर ट्रक्स भरण्यार नसल्याचे ही स्पष्ट केले .या भीक मागो आंदोलनात मनपा नगरसेवक विशाल निंबाळकर,  दानव,  किशोर जोरगेवार दिलीप पाठक भारत जितेंद्र चोरडिया जोशी तसेच वार्डातील  महिला व पुरुष बहुसंख्येनी उपस्थित होते.