वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर थकबाकीदाराने केली मारहाण : चंद्रपुरातील घटना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर थकबाकीदाराने केली मारहाण : चंद्रपुरातील घटना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

वीज थकबाकीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपणीच्या कर्मचाऱ्यांवर थकबाकीदाराने मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वा. चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डातील गवळी मोहल्यात घडली.


चंद्रपूर सब डिव्हीजन ऑफिसमध्ये कार्यरत महावितरणचे दोन कर्मचारी प्रेमानंद खंडाळे, रमेश टेकाम हे थकित  बिल वसुलीसाठी गवळी मोहल्ला येथील दीपक अंबादे यांच्याकडे गेले होते. 

त्यांनी थकबाकीची मागणी केली असता, अंबादे यांनी खंडाळे यांना मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली व धमकी दिली ,याबाबतची तक्रार  महावितरण कर्मचाऱ्याने शहर पोलीस ठाण्यामध्ये केली. पोलिसांनी आरोपीवर १८६, १८९, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कर्तव्यावर असताना मारहाण केल्यानंतर दखलपात्र गुन्ह्याची नोंद करणे गरजेचे असताना पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केल्याचा आरोप खंडाळे यांनी केला आहे.या घटने नंतर महावितरण कर्मचाऱ्यान मार्फत निषेध करण्यात आला. 

राज्यात याआधी देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे.