कुडेसावली येथील मोबाईल टॉवर बनले निव्वळ शोभेची वस्तू : नागरिकांची नेटवर्क च्या शोधात भटकंती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कुडेसावली येथील मोबाईल टॉवर बनले निव्वळ शोभेची वस्तू : नागरिकांची नेटवर्क च्या शोधात भटकंती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (गोंडपिपरी ग्रामीण प्रतिनिधी ):
अतिदुर्गम तालुका म्हनून ओळख असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी ' कुडेसावली परिसरात नेहमीच मोबाईल टॉवर  मुळे नागरिक त्रस्त असताना नागरिकांच्या समस्या लक्षात घेता कुडेसवली येथे आश्रम शाळेच्या बाजूला अरुण गोंधळी यांच्या जमिनीवर नवीन मोबाईल टावर उभे करण्यात आले.


मात्र सध्याच्या परिस्थिती बघितली असता हे नवीन उभे केलेले मोबाईल टॉवर केवळ देखावा आहे की काय ? असा प्रश्न कुडेसावलि परसोडी परिसरातल्या लोकांना उपस्थितीत होत असताना टॉवर  चे कामं गेल्या काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले मात्र अजूनपर्यंत मोबाईल टावर ला मशीन बसवल्या नसल्याने मोबाईल टॉवर चालू झाले नसल्याने परिसरातील लोकांना चालू होनार का ? की असाच देखावा आम्हाला दिसत राहणार अश्या चर्चा परिसरात होत असताना सध्या डिजिटल युग असल्याने सगळे इंटरनेट च्या जाळ्यात फसले असताना जो तो आपला मोबाईल पकडून नेटवर्क अभावी इकडे तिकडे नेटवर्क च्या शोधात भटकत असल्याचे चित्र दिसून येत आहे .


आजचे युग हे इंटरनेट चे असताना परिसरात नेटवर्क च्या कमतरतेमुळे परिसरातल्या लोकांना इंटरनेट चा हवा तसा आनंद घेता येत नसताना कुडेसावली येथे नवीन मोबाईल टॉवर  चे कामं सुरू झाल्याने कुडेसावली ' परसोडी गावात आनंदमय वातावारण निर्मान झाले .मात्र गेल्या काही काही महिन्यांपुर्वीच नवीन मोबाईल टावर चे कामं पूर्ण झाले पनअजूनपर्यंत टावर ला मशीन न बसविल्याने मोबाईल टॉवर सुरु झाले नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर कुडेसावली येथे नवीन झालेले मोबाईल टॉवर  हे शोभेचे वस्तूच उभे असल्यासारखे  असल्याने परिसरात चर्चा असून मोबाईल टॉवर हे केवळ देखावा आहे की काय ?.असा प्रश्न उपस्थित होत आहे. संदीप गव्हारे : युवा सामाजिक कार्यकर्ते