होमगार्ड मानधनाच्या प्रतीक्षेत : आचारसंहितेपूर्वी आदेश येऊनही पदरी निराशाच - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

होमगार्ड मानधनाच्या प्रतीक्षेत : आचारसंहितेपूर्वी आदेश येऊनही पदरी निराशाच

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुवस्था सांभाळणाऱ्या होमगार्ड प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र होमगार्ड अद्यापही वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.

कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांच्या मदतीला जाण्यासाठी होमगार्ड सदैव तत्पर असतात. पोलिसांएवढीच महत्वाची जबाबदार ते बजावतात. मात्र, होमगार्ड जवानांना आजही दुय्यम स्थान दिले जाते. विशेषत: वर्षभरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांसोबतच होमगार्डची नियुक्ती केली जाते. त्यासाठी प्रति दिवसाचे ४०० रूपये मानधन दिले जाते. महागाईच्या काळात तटपुंजे मानधन मिळत असल्याने विविध समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळेच दिवसाला ७५० रूपये मानधन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

नियमाप्रमाणे होमगार्डला वर्षभरात १८० दिवस काम देण्यात येईल. असे ठरले आहे. मात्र, उर्वरित दिवसात काम उपलब्ध न झाल्यास प्रपंच चालवावाया, तर कसा असा प्रश्न निर्माण होतो. होमागार्ड जवानांनी आम्हाला केली आहे. ही मागणी अद्यापही शासन दरबारी पणर््ूा झालेली नाही. अत्यल्प मानधनात ३६५ दिवस कामावर ठेवण्याची मागणी किती दिवस काम करावे, असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.

दुसरीकडे कामावरून कमी करण्यात आलेल्या जवानांनी अनेकदा आंदोलनेही केलीत. आंदोलनाचा सहानुभूती पूर्वक विचार करीत राज्य शासनाने ८ मार्च २०१९ ला शासन निर्णय काढला. यात शारीरिक पात्रतेच्या कठोर असलेल्या अटी शिथील करण्यात आल्या. तसेच वर्यामर्यादा ५५ वर्षावरून ५८ वर्ष करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. मात्र, यासंदर्भात विभागीय महासमादेशकांनी सदर शासन निर्णयावर प्रपत्र काढले नसल्याची माहिती आहे.