ब्रेकिंग न्यूज :राजुरा पोलिसांनी काही तासातच केला युवकाच्या खुनाच्या घटनेचा खुलासा:आरोपी राकेश उर्फ बाल्या वाघमारे अटकेत :महिला फरार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज :राजुरा पोलिसांनी काही तासातच केला युवकाच्या खुनाच्या घटनेचा खुलासा:आरोपी राकेश उर्फ बाल्या वाघमारे अटकेत :महिला फरार

Share This
 -पाहुण्या मुलीची छेड़खानी केली म्हणून खुन:

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा-
29/04/2019-4:30 PM-
   
राजुरा शहरातील इंदिरानगर परिसरातील संदेश रवि ठाकुर या इयत्ता दहावीत शिकणा-या मुलाच्या खुनाचा उलगडा पोलीसांनी केला असुन या प्रकरणी राकेश उर्फ बाल्या  वाघमारे, वय २८ व माया सोनारकर,वय २५ या दोन आरोपींना भादंवि कलम ३०२ व ३४ यानसार खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली.

     
मिळालेल्या माहितीनुसार मृत संदेश ठाकुर हा मुलगा माया सोनारकर यांचे घरी मध्यप्रदेश मधून आलेल्या एका पाहुण्या मुलीला छेडत होता. मागील वर्षीही संदेशने या मुलीला त्रास दिला होता. अनेकदा समजून सांगुनही तो एैकत नव्हता. अखेर संतापून माया सोनारकरने तिच्या परिचीत असलेल्या राकेश वाघमारेला ही माहिती दिली. 

रविवारच्या रात्री दहा वाजता राकेशने संदेशला बोलावून शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर नेले. तेथे अंधार असलेल्या भागात नेऊन राकेश ने काडीने संदेशच्या  डोक्यावर प्रहार केला. तो तेथे कोसळल्यानंतर लाथाबुक्क्याने मारहाण केली. यातच संदेश चा मृत्यू झाला. यावेळी माया सोनारकर तेथे उपस्थित  होती. रात्री पाऊणे अकरा वाजता ही घटना घडली.
     
घटनेचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार बाळू गायगोले व  चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी केला.
_________________________________________

ब्रेकिंग न्यूज ::राजुरा शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात आढळला युवकाचा मृतदेह 

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -
29/04/2019-7:30AM

राजुरा येथील आसिफाबाद रोड वर असलेल्या शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणात आज सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना युवकाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ.


इंदिरा नगर परिसरात राहणारा संदेश रवी ठाकुर (16 वर्ष )हा युवक काल जेवण करून रात्री 10:30 वाजताच्या सुमारास फिरायला गेला. रात्रभर मुलगा घरी न आल्यामुळे सकाळी पालकांनी शोधाशोध सुरू केली असता त्यांना सकाळी फिरणार्‍या लोकांना युवकाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मुलाची आई, आजी व बहिण घटनास्थळी पोहोचल्या असता त्यांना संदेश ठाकुर ह्याचा मृतदेह आढळला.

मृतकाच्या डोक्याच्या मागील भागात घाव असुन कानातून रक्त निघाल्याचे दिसत आहे तसेच शरीरावर जखमाही आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेतला असुन ठाणेदार बाळू गायगोले यांच्या मार्गदर्शननात पुढील तपास सुरू आहे.

आधीच राजुरा शहर लैंगिक अत्याचार प्रकणात देशभर गाजत असून, दररोज नव नवीन गुन्हेगारीच्या घटना उजेडात येत असल्यामुळे शहरातील नागरिक शासन-प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उभे करीत आहेत.