बालाजी वार्डातील पाणी समस्यांवर नागरिकांनी आयुक्तांना केला घेराव :दोन दिवसात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बालाजी वार्डातील पाणी समस्यांवर नागरिकांनी आयुक्तांना केला घेराव :दोन दिवसात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न हा कृत्रिमरित्या तयार केला गेला असल्याची ओरड होतं असतानाच बालाजी वार्डातिल जवळपास शेकडो घरी नळाद्वारे पाणीच पोहचत नाही. 


या संदर्भात गेल्या चार वर्षापासून मनपा आयुक्त. महापौर आणि पाणी पुरवठा कंत्राटदाराला निवेदने देण्यात आली मात्र त्याचा उपयोगच होत नसल्याने शेवटी बालाजी वार्डातिल नागरिकांनी मनपा आयुक्त याना दिनांक 17 एप्रिलला त्यांच्या कार्यलयात जावून घेराव केला होता. 

या दरम्यान नागरीकामधे जो आक्रोश होता तो त्यांनी बघितला व पाणी पुरवठा कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांला बोलवून बालाजी वार्डातिल पाणी समस्या त्वरित सोडविण्याचे आदेश दिले. मात्र अजून पावेतो मनपा प्रशासनाने पाईप लाईन दुरुस्ती. नवीन पाईप लाईन आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने कनेक्षन घेवून इतरांचं पाणी आपल्याकडे वळवीण्याचे काम केले त्यांचेवर करवाई केली नसल्याने या नंतर सर्व नागरिक मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा वार्डातिल पाणी समस्याग्रस्त जितेंद्र चोरडिया दिलीप पाठक, ज्योती पाठक,जुमडे,पडवे,सोनटक्के,करुणा जुमडे इत्यादींने केला आहे.