जेव्हा कोठारी ठाणेदारांची गाडी धावू लागली ऍम्ब्युलन्स बनून : मातेने दिला रुग्णालयात गोंडस बाळाला जन्म - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जेव्हा कोठारी ठाणेदारांची गाडी धावू लागली ऍम्ब्युलन्स बनून : मातेने दिला रुग्णालयात गोंडस बाळाला जन्म

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोठारी -

प्रसूतीसाठी ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध नसल्याने मदतीच्या संकटात नेहमीच सहकार्यात असणारे पोलीस स्टेशन कोठारी चे ठाणेदार संतोष अंबिके यांना ह्या संदर्भात माहिती मिळताच आपल्या गाडीने क्षणाचा विलंब न करता चंद्रपूर जिल्ह्या रुग्णालयात घेऊन गेल्याने वेळेवर प्रसूती करण्यात आली.


गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथील तेजश्री सुनील मोगरकर वय 30 यांना प्रसूतीच्या कळा येत होत्या परंतु चंद्रपूर येथे जाण्यासाठी ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्याने किडेसावली येथील पोलीस पाटील रमाताई चांदेकर यांना मदतीसाठी सांगण्यात आले पोलीस पाटील चांदेकर यांनी 108 या नंबर वर फोन लावून ॲम्बुलन्स उपलब्ध करण्यासाठी सूचना दिल्या परंतु वेळ फार कमी असल्याने कोठारी व तोहोगाव येथील खाजगी गाड्यांना सांगितले पण येथील खाजगी गाड्या सुद्धा लग्नसराईमुळे फुल्ल बुकिंग असल्याने उपलब्ध झाले.

असता पोलीस पाटील रमा चांदेकर यांनी कोठारी चे ठाणेदार संतोष अंबिके यांना याची माहिती दिली संतोष अंबिके यांनी समय सूचकता ठेवून कुडेसावळी येते आपल्या सहकाऱ्यांसह येऊन चंद्रपूर जिल्ह्यात प्रसूतीसाठी आपल्या पोलीस व्हॅन गाडीत घेऊन गेले त्यामुळे वेळेवर एका मातेची दवाखान्यात योग्य वेळी प्रसूती होण्यास मदत झाली परंतु तोहोगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुद्धा येथे कोणत्याही प्रकारे पद रिक्त असल्याने संबंधित परिसरातील रुग्णांना अशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो प्रसंगी दगावण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. 

जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन पाहणी करून कामात कसूर करण्यात आलेल्या कर्मचऱ्यांना निलंबित केले होते परंतू ती जागा रिक्त आहे  कोठारी चे पोलीस ठाणेदार यांनी माणुसकीची प्रचिती देत कुडेसावली  येथे असलेल्या आश्रम शाळेतील लिपिक सुनील मोगरकार यांच्या पत्नीला व नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला वेळेवर रुग्णालयात पोहोचल्याने गावात व परिसरात ठाणेदार व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करीत आहे आणि आरोग्य विभागाचा उदासीन धोरणाला नाराजी व्यक्त होताना दिसत आहे