ग्राम पंचायतीचे कामकाज राष्ट्रवनंदानें सुरू करा :युवा समाज सेवा ग्रुप अडेगाव यांची ग्रामसचिवांना विनंती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्राम पंचायतीचे कामकाज राष्ट्रवनंदानें सुरू करा :युवा समाज सेवा ग्रुप अडेगाव यांची ग्रामसचिवांना विनंती

Share This
-ग्रामपंचायत अडेगाव व युवा समाजसेवा ग्रुप अडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महान राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांची ११० वि जयंती संपन्न.

खबरकट्टा / यवतमाळ :

राष्ट्रसंत म्हणतात,"देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करु शकतील."त्याचप्रकारे युवा समाजसेवा ग्रुप, अडेगाव  चे सर्व सदस्यगण आपला मौल्यवान वेळ हा समाजाच्या चांगल्या कामासाठी अर्पण करत आहे.


               "या भारतात बंधुभाव नित्य वसू दे"

आज दिनांक 30 एप्रिल  2019 रोजी राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांची  ११० जयंती अडेगाव ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत ची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यलयाला भेट देऊन उत्साहात साजरी करण्यात आली.

त्या अनुषंगाने युवा समाजसेवा ग्रुप च्या माध्यमातून ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले,की "ग्रामपंचायतीचे कामकाज राष्ट्रवंदनेनी सुरू करण्यात यावे ".अश्या महापुरुषाचे विचार आपल्या आचरणात घेऊन जर विकास काम केले तर गावाचा विकास होण्यास मदत होईल.

या वेळी  ग्रा.प.सरपंच अरुण हिवरकर, पो.पा. अशोकजी उरकुडे व ग्राम पंचायत सर्व सदस्य गणांसहित गावातील प्रतिष्ठित नागरिक, बंडू पारखी,गोविंदा उरकुडे,वाघुजी उरकुडे,जनार्धन मोहितकर,सुधाकर लालसरे,धनंजय पाचभाई,प्रभाकर सूर,विनोद आसुटकर, विजय जुमणके,गजानन पाचभाई उपस्थित होते.

सोबतच युवा समाजसेवा ग्रुप चे विजय लालसरे,गिरीधर राऊत,सुनील लांडगे,दत्ता लालसरे,गणेश बुरडकर,राकेश किनेकर,विलास देठे,प्रदीप पेटकर,दिगंबर पाचभाई,राहुल ठाकूर,खुशाल पारखी,अविनाश झाडे,राहुल पाचभाई,देवराव पेटकर,महेंद्र पाल,योगेश बेलेकर,प्रणल गोंडे,दिवाकर हिरदेवें आदी उपस्तीत होते.