राजुरा येथे भरधाव अनियंत्रित वाहनाची ची जबरदस्त धडक : दोन गंभीर जखमी : चालक फरार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथे भरधाव अनियंत्रित वाहनाची ची जबरदस्त धडक : दोन गंभीर जखमी : चालक फरार

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर ()राजुरा :

आज दिनांक 19 एप्रिल 1019 रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान राजुरा येथे जुने बस स्थानकाच्या समोर असणाऱ्या फ्रुट मार्केट जवळ हैद्राबाद महामार्गावरून भरधाव येणाऱ्या वाहन क्रमांक RJ17-GA-5539 या जड वाहतूक करणाऱ्या वाहनाने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे जबर धडक दिली.


वाहनाची गती अनियंत्रित झाल्याचे ध्यानात येताच चालकाने उडी घेऊन स्वतःचा बचाव करत पोबारा केला त्यानंतर वाहन समोर उभ्या असलेल्या झाडाला आदळून रोडलगतच्या उभ्या असलेल्या ऑटोरिक्षा व दुचाकीला धडक दिली यात दोन व्यक्ती  जखमी असून एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून दुसरी उभी असलेली महिलाही जबर जखमी असल्याची प्राथमिक माहिती येत आहे.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून घटना स्थळी उभ्या असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे वर्दळीचे ठिकाण असूनही अनेकांचे जीव बचावले असे प्रतर्दर्शीनी खबरकट्टा प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.