सद्यस्थिती राजकीय विश्लेषण : विजय वड्डेटीवारांनी ने केला सुभाष धोटे चा ‘गेम’ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सद्यस्थिती राजकीय विश्लेषण : विजय वड्डेटीवारांनी ने केला सुभाष धोटे चा ‘गेम’

Share This
खबरकट्टा / विशेष : (संपादकीय विश्लेषण):

राजूरा येथील अल्पवयीन विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचाराच्या आडून काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी भविष्यातील राजकीय ‘अडसर’ ठरू शकणाऱ्या सुभाष धोटे यांचा ‘गेम’ केल्यांची दबकी चर्चा चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.  हे खरे असल्यास भविष्यात यापूढे काँग्रेसचे जिल्हयात किती अस्तित्व राहील ? असाही प्रश्न या निमीत्ताने उपस्थित झाला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज्यात युती आहे.  चंद्रपूर जिल्हयात राष्ट्रवादीचे अस्तित्व फार नसले तरी, अनेक नेते या पक्षाशी जुळून आहेत.  आघाडीत राष्ट्रवादीने राजूरा आणि ब्रम्हपुरी या दोन जागाची मागणी केली आहे.  दोन पैकी एकवर राष्ट्रवादी तयार होईल अशी शक्यता आहे आणि असे झाले तर, राष्ट्रवादीचा मजबूत दावा ब्रम्हपुरीवर राहील हे लक्षात घेवूनच तर धोटेचा गेम होत नसावा ना? अशीही शंका व्यक्त  केली जात आहे.  

चंद्रपूर जिल्हयात राष्ट्रवादीला एकच जागा द्यायची झाल्यास, त्यांचे जिल्हाध्यक्ष असलेले आणि मागील निवडणूकीत थोडया मतानी पराभूत झालेले संदिप गड्डमवार यांनाच द्यावी लागेल, अशा परिस्थित ब्रम्हपुरीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडू शकते.  हे टाळायचे असेल तर, राजूरा राष्ट्रवादीसाठी ,खुले ठेवणे हाच पर्याय होता आणि जोपर्यंत धोटेचे काटे या मार्गातून निघणार नाही, तोपर्यंत काँग्रेस राजूराचा दावा सोडणार नाही, हे गृहीत  धरूनच हा प्लॅन आखला असावा.

ब्रम्हपुरीचे प्रतिनिधीत्व विजय वड्डेटीवार करीत आहेत.  ते राज्यातील बडया नेत्यांपैकी एक असल्यांचे त्यांची उमेदवारी ब्रम्हपुरी येथून कापणे सहज शक्य नसले तरी, त्यांचे पक्षाअंतर्गत दुश्मनाची मोठी फळी आहे. अनेक बडया नेत्यांची नाराजी त्यांचे भोवती आहे.  नुकत्यांच संपन्न झालेल्या, लोकसभेच्या निवडणूकीत त्यांच्याच क्षेत्रातील चिमुर-गडचिरोली क्षेत्रातून, विजय वड्डेटीवार डॉ. नितीन कोडवत्ते यांना उमेदवारी मागीतली.  आपले समर्थकांना दिल्लीत पाठवून, जोरदार फिल्डींगही लावली असतांना, त्यांचे विरोधात जावून पक्षानी डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिली.  

चंद्रपूरातूनही त्यांनी आधीपासून शिवसेनेतील बाळू धानोरकर यांचेसाठी हट्ट धरला असतांना, अखेरच्या क्षणी शरद पवारांनी राष्ट्रवादीचा गेम खेळल्यांने, उमेदवारी बाळू धानोरकर यांना मिळाली.  काही महिण्यापूर्वीच, विजय वड्डेटीवारचे खंदे समर्थक प्रकाश देवतळे यांची पक्षानी जिल्हाध्यक्ष पदावरून कुणाच्याही ध्यानी मनी नसतांना उचलबांगडी करीत, सुभाष धोटे यांना हे पद दिले होते.  

या सर्व घडामोडीवरून, वरिष्ठ पातळीवर विजय वड्डेटीवार यांची फार मोठी राजकीय ताकद नाही हे सहज स्पष्ट होते.  केवळ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे ते निकटवर्तीय असल्यांने, त्यांचे मर्जीवरच यांचे राजकारण अवलंबून आहे.  या परिस्थितीत वड्डेटीवार हे बडे नेते असले तरी, ब्रम्हपुरी मधून पुन्हा तिकीट मिळविण्यांसाठी होणारी संभाव्य अडचण टाळण्यांसाठीच त्यांनी राजूरा राष्ट्रवादीसाठी ‘सेफ’ केले असल्यांचे बोलल्या जात आहे.

मागील विधानसभेत भाजपाचे संजय धोटे विजयी झाल्यानंतरच्या जवळपास सर्व निवडणुकांत राजूरा विधानसभेच्या क्षेत्रात काँग्रेसनी चांगले यश मिळविले.  आताच्या लोकसभेच्या निवडणुकीतही इतर क्षेत्राच्या तुलनेत राजूरा क्षेत्रातील काँग्रेसची आघाडी अधिक राहील.  असे झाले तर, या क्षेत्राचे सुभाष धोटे यांचे राजकीय कारकिर्दीचे अच्छे दिन येण्यांचीच शक्यता आहे.  अशा परिस्थितीत पुढील विधानसभा काँग्रेसने जिंकली तर, वरीष्ठ नेते म्हणून सुभाष धोटे हे मंत्रीपदाचेही दावेदार ठरतील याची कल्पना ‘धुर्त’ असलेल्या वड्डेटीवारांना आहे आणि त्यातूनच आतापासून धोटेचे पंख छाटण्यांचे काम ते करीत आहेत असे चर्चेत बोलल्या जात आहे.

राजूराचे प्रकरणात सुभाष धोटे हे आरोपीच्या पिंजऱ्यात असतांना, वड्डेटीवारांनी त्यांना, सुधीर मुनगंटीवार यांचेवर  अटॅक करणाऱ्या पत्रकार परिषदेत बोलाविले.  आधीच अडचणीत आलेले व्यक्ती सत्तेतील बड्या नेत्यांचे विरोधात भ्रष्टाचारांचे आरोप लावण्यांची तेही धोटे सारख्या सयंमी राजकारणी स्वत:चे डोक्यांनी करेल काय?  

पत्रकार परिषदेत धोटे उपस्थित दिसले तर पत्रकार निश्चितच राजूरा प्रकरणावर प्रश्न विचारतील आणि धोटे अडचणीत येतील हे आधीच गृहीत होते आणि झालेही तसेच!  धोटेंनी आपले मत या  प्रकरणावर व्यक्त केल्ल्यानंतर, त्याचीच रि ओढली  वड्डेटीवार यांनी या प्रकरणाला राजकीय वळण दिले. सुभाष धोटे या प्रकरणात अस्वस्थ असल्यांने, त्यांचे तोंडी या प्रकरणाची समर्थनाची भाषा निघू शकते, परंतू, त्यांना त्याची चुक लक्षात आणून देण्यांऐवजी आगीत तेल ओतण्यांचे काम वड्डेटीवारांनी जाणून बुजून तर केले नाही ना? अशीही शंका आता व्यक्त केली जात आहे.

एन.डी. हाॅटेल मधील त्या चर्चीत पत्रकार परिषदेत, सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार या दोघानीही आदिवासी बद्दल सारखीच आपत्तीजनक टिप्पणी केली मात्र अॅट्रासिटी फक्त थेट सुभाष धोटेवरच लागली. विजय वडेट्टीवार या प्रकरणात आरोपी आहे काय? हे 'इतर' या सदराखाली गुलदस्त्यातच आहे. 

एन. डी. हॉटेलमधील प्रेस कॉन्फरन्सची बातमी आपल्याच विरोधात जात असल्यांचे पाहून, वड्डेटीवारांनी दुसरेच दिवशी ‘एकटेच’ माफीनामा सादर केला, यावेळी सुभाष धोटे हे तेथे उपस्थित नव्हते, ही बाब त्यांचा गेम केल्यांचेच निदर्शक असल्यांचे दिसते.