राजुरा येथील नामांकित रेस्टॉरंट मधील नाश्त्यात भांडे घासायची घासणी : ग्राहकांच्या जिविताशी खेळ : कार्यवाहीची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथील नामांकित रेस्टॉरंट मधील नाश्त्यात भांडे घासायची घासणी : ग्राहकांच्या जिविताशी खेळ : कार्यवाहीची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा शहर प्रतिनिधी) 

राजुरा शहरातील प्रसिद्ध नागराज क्याफे ह्या रेस्टॉरंट मध्ये श्री सुभाष साळवे हे ग्राहक सकाळी नाश्ता करण्यासाठी गेले त्यांनी पराठा मागवलाहा पराठा व भाजी खात असताना त्यांना घशात काही तरी अडकल्याचे जानवले असता त्यांनी ती वस्तु बाहेर काढून बघितली असता ती चक्क भांडे घासायची घासणी होती. 


ग्राहकाने ह्याबावत रेस्टॉरंट मालकाना दाखवली असता त्यांनी माफी मागुन विषय समपवन्याचा प्रयत्न केला परंतू ही घासणी ग्राहकाच्या घशात अडकली असती किंवा पोटात गेली असती तर ही बाब ग्राहकाच्या जिवावर बेतली असती हे जानुन ग्राहकाने न प च्या मुख्याधिकारी ह्यांच्याकडे ह्याबाबत तक्रार केली रेस्टॉरंट वर कारवाईची मागणी केली आहे एवढ्या नामांकीत रेस्टॉरंट मध्ये घडलेला हा प्रकार ग्राहकाच्या आरोग्याशी खेळणारा असल्यामुळे नप प्रशासन ह्यावर काय कारवाई करते ह्याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.