नांदगावात भिषण पाणी टंचाई :पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प : नाल्यातील विहिरीवर तीन गावातील तृष्णापूर्ती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नांदगावात भिषण पाणी टंचाई :पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प : नाल्यातील विहिरीवर तीन गावातील तृष्णापूर्ती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (गोंडपिपरी-ग्रामीण प्रतिनिधी)-

गोंडपिपरी तालुक्यातील नांदगावाला होणारा पाणीपुरवठा मागिल पंधरा दिवसापासून बंद आहे.त्यामुळे नांदगाव,हेटी नांदगाव,टोलेनांदगावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नाल्यात विहीरा खोदून गावकरी आपली तहान भागवित आहेत.

तालूक्यातील हेटी नांदगाव,टोले नांदगाव,नांदगाव गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. त्यामुळे केवळ नळाचा पाण्यावरच त्यांची तहान भागत असते.या तिन गावांना चेकबापुर ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. 

मात्र ठेकेदाराचा गलथान कारभारामुळे नांदगावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.मागिल पंधरा दिवसापासून नळांना मुबलक पाणी पुरवठा केला जात नाही . एक दोन बाटली ऐवढेच पाणी नळातून मिळते आहे. केव्हा केव्हा चार ते पास दिवस नळांना कोरड पडलेली असते. ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभिर झाल्याने गावकर्यावर मोठे संकट कोसळले आहे. 

गावापासून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या नाल्यात गावकर्यांनी खड्डा खोदला खोंदला. या खड्यातील पाण्यावर तिन्ही गावाची तृष्णापुर्ती होत आहे.

दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपिट अनेकदा गावकर्यांनी वाचली. मात्र पंधरा दिवस लोटले असतांनाही नळाची समस्या अद्याप सूटलेली नाही असे खबरकट्टा प्रतिनिधींशी बोलताना गावकर्यांनी सांगितले.