घुगुस येथे निवडणुकीवरून दोन गटात वाद : जीवघेण्याचा प्रयत्न केल्याचा कामगार नेत्याचा आरोप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घुगुस येथे निवडणुकीवरून दोन गटात वाद : जीवघेण्याचा प्रयत्न केल्याचा कामगार नेत्याचा आरोप

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर (घुगुस):
लोकसभा निवळणुक संपल्या नंतर सामुदायिक मनोरंजन केंद्रा   वरील मतदान बुथावर पंचायत समिति सदस्य निरीक्षण तांडरा, ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी हे मतदान केंद्राच्या आत असून कांग्रेस कार्यक्रत्याला आत जावू देत नसल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तौफीक शेख यांनी घुग्घुस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांना मोबाइल वरुण माहिती दिली असता  कामगार नेते सैय्यद अनवर हे राजुरेड्डी यांच्या सोबत गेले.


त्यावेळेस राजुरेड्डी उपस्थित पोलिसांशी चर्चा करीत असतांना निरिक्षण तांडरा यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात  केली व मदतिला सदानंद तांडरा याला मददतीस बोलावून मारहाण करण्यास   केली.

यावेळेस शेजारी असलेले जवळपास 40 ते 50 कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला त्यावेळेस उपस्थित स्मार्थकानी कामगार नेते यांना गाडीत बसवून बाजूला  काढण्याचा प्रयत्न केला असता सदानंद तांडरा याने वाहनावर हल्ला चढविला.

सुदैवाने वाहन थांबले नाही वाहन थांबले असते तर कामगार नेता सैय्यद अनवर यांचा जिव घेतला गेला असता ही वार्ता पसरताच कांग्रेस कार्यकर्ता मध्ये असंतोष पसरला मात्र शांत स्वभावाचे सैय्यद अनवर यांनी कार्यकर्त्यांचा सांत्वना केली उमेदवार हरत असल्याच्या निराशेतुन हा जिव घेणा हल्ला केला असून आपण कायद्यावर विश्वास ठेवावा ऎसे आवाहन कामगार नेते यांनी केले व घुग्घुस पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.