पिट्टीगुडा ठाणेदारचा युवकावर चाकूने हल्ला :जखमीला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पोबारा : मनसेने धरले धारेवर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पिट्टीगुडा ठाणेदारचा युवकावर चाकूने हल्ला :जखमीला गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पोबारा : मनसेने धरले धारेवर

Share This
खबरकट्टा / जिवती (पिट्टीगुडा): 

कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका ठाणेदारा कडूनच खिशातील धारदार चाकू काढून एका युवकाच्या डोक्याचे केसांसह चक्क कातडीच काढून जमीनीवर फेकल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडली आहे. 


सविस्तर वृत्त असे की आंबेझरी येथील देविदास कंदलवार नामक युवक दारूच्या नशेत गावकऱ्यांना त्रास देत होता.त्यासंदर्भात काल दिनांक 27एप्रिल 2019 ला  पिटीगुडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने सदर ठाण्याचे ठाणेदाराने रात्री 11वाजता कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता तीन शिपाई घेऊन सरळ घरात घुसून देविदासला अमानुष मारहाण सूरू केली. इतक्यावरच समाधान न मानता ठाणेदाराने खिशातून धारदार चाकूने त्याचे डोक्यातील केसांसह चक्क कातडीच काढून जमीनीवर फेकली. 

देविदास रक्तबंबाळ झाल्याचे पाहून पत्नीने मदात येऊन सोडवायचा प्रयत्न केला मात्र त्यालाही जबर मारहाण करून जखमी करण्यात आले.तसेच यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सुद्धा हाकलून लावण्यात आले.

घटनेनंतर देविदासचा रक्तस्त्राव वाढत असल्याचे लक्षात घेऊन सदर ठाण्यातील पोलिसांनी रात्री उशिरा देविदासला जखमी अवस्थेत गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे आणले व कोणतीही मदत न करता पोबारा केला .सकाळी सदर घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. येथील काही संधीसाधू, तथाकथित नेते व ठाणेदाराच्या काही मित्रमंडळी कडून प्रकरण दडपण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला परंतु येथील नागरिकांच्या सजगतेने सफलता मिळाली नाही.

कायद्याचे रक्षणकर्ताच जर भक्षक बनले तर सर्वसाधारण लोकांनी दाद कुणाला मागावी,असे सदर प्रकरणावरून लक्षात येते त्यामुळे या विषयावर मनसेचे जिल्हा संघटक राजू कुकडे, जिल्हा सचिव तथा राजुरा विधानसभा अध्यक्षमहालिंग कांबळे   जिवती तालुका अध्यक्ष हाकानी शेख, गडचांदूर शहर अध्यक्ष  रुपेश रोहने, कोरपना तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, पंकज माणूसमारे यांनी ठाणेदाराच्या हा अमानवीय कृत्य माणुसकीला काळीमा फासणारा असून सदर ठाणेदारावर कायदेशीर कारवाई करून त्याच्या निलंबनाच्या मागणीचे निवेदन आज उपविभागीय पोलीस अधिकारी ,आवाळपूर यांचेकडे सदर केले आहे.  

आता मात्र वरीष्ठ पातळीवर याची दखल घेऊन ठाणेदारावर निलंबनाची कारवाई होते की प्रकरण दडपले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.