अल्पवयीन आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणी वसतिगृह अधीक्षकाच्या खिश्यात सापडली निरोधके : जनमानसात प्रचंड रोष - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अल्पवयीन आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणी वसतिगृह अधीक्षकाच्या खिश्यात सापडली निरोधके : जनमानसात प्रचंड रोष

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा):

येथील इन्फंट जीजस इंग्रजी शाळेतील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या  प्रकरणामुळे राजुरा तालुक्यासह संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यात खळबळ उडाली असुन पीडित अल्पवयीन मुलींना न्याय मिळेल की राजकीय बळाचा वापर करून पीडित शोषित विद्यार्थिनींचा बळी घेण्यात येईल अशी चर्चा नागरिकांत सुरु झाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील सात व नऊ वर्षीय दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर वसतिगृह अधीक्षकाला या प्रकरणी चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे व त्याच्या खिश्यात निरोधकांची पाकिटे सापडली असल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे. 

या दोन विद्यार्थिनी आदिवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेत होत्या. दोन मुलींवर वारंवार अत्याचार केला. त्यामुळे या दोन्ही मुलींची मानसिक स्थिती खालावली. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले परंतु येथील डॉक्टरांनी दोघींना वैद्यकीय महाविद्यालयात तथा जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी त्वरित नेण्याचे सांगितले. 

चंद्रपूर येथे डॉक्टरांनी पाहताक्षणी  अत्याचार झाला असल्याचे स्पष्ट करून दोन्ही मुलींना वैद्यकीय चाचणी करीता नेण्यात आले. दरम्यान यापूर्वी सुद्धा याच वसतिगृहातील दोन ते तीन मुलींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात नेण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे.  

 • माझी मुलगी 6तारखेपासून भरती असून तिला काय झाले आम्हाला वसतिगृहातून सांगण्यात आले नाही.माझ्या उपस्थितीत प्रत्यक्ष वॆद्यकीय तपासणी दरम्यान तिच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या  आहेत. आम्ही न्यायची मागणी करत आहोत- 9वर्षीय  पीडितेची आई 

त्यामुळे एकूणच आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना विचारणा केली असता त्यांनी प्रकरणाची चौकशी सुरू आहे चौकशी झाल्या नंतर माहिती देऊ असे प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान या वसतिगृहात यापूर्वीही आदिवासी मुलींवर अश्याच प्रकारे अत्याचार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी वसतिगृहातील अधीक्षकास अटक केली असून अपराध क्रमांक १८५/२०१९ कलम ३७६ (अ)(ब) सहकलम ४ पोस्को अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.