👊लढण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत मुली :अविनाश पोईनकर यांची राजुरा वसतिगृह अमानवीय घटनेवर निषेधात्मक कविता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

👊लढण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत मुली :अविनाश पोईनकर यांची राजुरा वसतिगृह अमानवीय घटनेवर निषेधात्मक कविता

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर (राजुरा): विशेष 

येथील इन्फंट जीजस शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेला अत्याचार माणुसकीला काळीमा भासणारा आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी. जाहीर निषेधार्थ हि कविता.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👊लढण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत मुली...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

घराघरात आता पेटताहेत चुली
लढण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत मुली

अबला नव्हे सबला जाणून घ्या तुम्ही
गर्भातून मर्दांना जग दावतो आम्ही
तरी भ्रुणहत्येसाठी तूच पुढे येतो
वंशाच्या दिव्यासाठी तूच शेण खातो
आता आम्ही आमची देणार नाही बली
लढण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत मुली...

शाळेत जात असताना तू नजर ठेवतो वाईट
मीही मनात ठरवलं तुला द्यायची फाईट
कोवळ्या कळ्या कुस्करताना तुला नाही लाज
अर्थकारणाच्या जोरावर तुला चढलाय माज
तुझी नशा उतरवल्यावर राहणार नाही वाली
लढण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत मुली...

गुंगीचे औषध देऊन तू इज्जतीवर भाळतो
सांग तुझ्या माय बहीन मुलीशी तू असाच खेळतो
आमचा आवाज दाबण्यासाठी तू कितीही रड
आक्रोश आणि मोर्चे तुझं फोडणार अख्ख धड
तुझं सरण रचतेय बिनभाड्याची खोली
लढण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत मुली...

झाशी अहिल्या सावित्रीच्या आम्ही आहोत लेकी
अन्याय, अत्याचार आता तुमच्यापुरते बाकी
निर्भयाच्या वेदनेची अजून आग आहे पेटत
भर चौकात तुम्हालाही तसेच आणेल रेटत
स्त्री शक्तीच्या सन्मानाला व्हा संघर्षाच्या ढाली
लढण्यासाठी रस्त्यावर उतरताहेत मुली...

✍ अविनाश पोईनकर
बिबी, जि.चंद्रपूर, मो.७३८५८६६०५९

➖➖➖➖➖➖➖➖➖➖