वीज पडल्याने २० पोत्यांची गव्हाची गंजी जडुन खाक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वीज पडल्याने २० पोत्यांची गव्हाची गंजी जडुन खाक

Share This
-साठगाव येथील शेतकरी भाष्कर ठाकरे यांचे अंदाजे 40 हजारांचे आर्थिक नुकसान

खबरकट्टा /(चिमूर:-अरविंद राऊत)

   
दिनांक 11एप्रिल 2019 ला सायंकाळी अचानक वातावरण बदल होऊन जोराचे वादळ व विजांचा कडकडाट होऊन हलका पाऊस झाला.
    
विजांचा कडकडाट सुरू असताच शंकरपूर येथून जवळ असलेल्या साठगाव येथील शेतकरी भाष्कर ठाकरे यांच्या शेतात वीज पडल्याने त्यांची शेतात असलेली गव्हाची गंजी जडून खाक झाली यात त्यांचे २० पोत्यांचे नुकसान झाले असून 40 हजारांचे आर्थिक संकट त्यांचेवर आले आहे.
या घटनेची माहिती साठगाव येथील तलाठी यांचे मार्फतीने महसूल विभागाला दिली असून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिडण्याबाबत शेतकरी भाष्कर ठाकरे यांनी मागणी केली आहे.