इंजिनियर असलेल्या दत्तक मुलीने क्रिकेट खेळाडू बॉयफ्रेण्डच्या मदतीने केली वृद्ध दाम्पत्यांची हत्या १८ तासाच्या आत आरोपी अटक : दत्तक मुलीनेच केला मातापित्यांची हत्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

इंजिनियर असलेल्या दत्तक मुलीने क्रिकेट खेळाडू बॉयफ्रेण्डच्या मदतीने केली वृद्ध दाम्पत्यांची हत्या १८ तासाच्या आत आरोपी अटक : दत्तक मुलीनेच केला मातापित्यांची हत्या

Share This

खबरकट्टा / नागपूर :
दत्तवाडी येथील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचे कोणत्याही प्रकरनाचे धागेदोरे नसताना १८ तासांच्या आत घटनेचा पर्दाफाश करण्यात नागपूर शहर पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात मृतक दाम्पत्याची आयटी इंजिनियर असलेली दत्तक मुलगी आणि तिचा क्रिकेट खेळाडू बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे. 

मो.इकलाक मुस्ताक खान (वय २३ रा. वडधामना.नागपूर) व ऐश्वर्या उर्फ प्रियंका शंकर चंपाती (वय २५, राहणार सुरक्षानगर दत्तवाडी, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.मालमत्तेच्या वादातून या दोघांनी त्याची हत्या केल्याची पोलीसांना संशय आहे. 

मुलबाळ नसल्याने वृद्धपकाळात सांभाळ करण्यासाठी ज्या मुलीला दत्तक घेतले, जिच्यासाठी प्रॉपर्टी जमविली तिनेच घात करावा, हा येथे चिंतनाचा विषय ठरला आहे.

१)शंकर चंपाती यांचा दत्तवाडी चौक डिफेन्स गेटजवळ टपरी लावून नारळपाणी विकण्याचा व्यवसाय होता.त्यांच्यावर तीन ते चार महिन्यापूर्वी दुकानात असताना हल्ला करण्यात आला होता. याची त्यांनी वाडी पोलिसात तक्रार केली होती. नंतर घरी जात असताना एकेदिवशी रस्त्यात त्यांना अनोळखी गाडीने त्यांना धडक दिली होती. नंतर त्यांना धमकीही देण्यात आली होती. या दोन्ही घटनांमागे प्रियंकाचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

२) प्रियंकाने घटनेच्या दिवशी वृद्ध मातापित्याना सकाळी नाश्त्या मध्ये गुंगीचे औषध दिले .त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास प्रियंकाने तिचा प्रियकर इकलाक खानला घरी बोलविले व वृद्ध बेहोश असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर वार करून टोकदार शस्त्राने शंकर चंपाती यांचा गळा कापला. घरी एक कुत्रा होता व त्याचा आवाज न येण्यासाठी प्रियंकाने कुत्र्याला शांत करून ठेवले होते. दोघांना ठार केल्यानंतर इकलाक व प्रियांका घरून निघून गेले.

वाडी पोलीस ठाण्यात येणाऱ्या सुरक्षा नगर येथे रविवार, १४ एप्रिल रोजी एका घरात वृद्ध पतीपत्नीचे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. शंकर अतुलचंद्र चंपाती (७०) व सीमा शंकर चंपाती(६०) अशी मृतकांची नावे आहेत. शंकर चंपाती यांचा दत्तवाडी चौकात नारळपाणी विकण्याचा व्यवसाय होता.व पत्नी सीमा गृहिणी होती. चंपाती दाम्पत्याला संतती नसल्यामुळे त्यांनी मुलगी प्रियंका चंपाती (२५)हिला दत्तक घेतले होते. प्रियंका आयटी इंजिनियर असून आयटी पार्क येथे एका कंपनीत नोकरी करते. मो. इकलाक तिचा बॉयफ्रेण्ड असून तो क्रिकेट खेळाडू आहे. तो रणजी खेळला असल्याचे समजते.

१४ एप्रिल रोजी भरदिवसा नारळ कापण्याचा कोयता व लाठीने हल्ला करून निर्घृणपणे चंपाती दाम्पत्याचा खून करण्यात आला. रात्री ०८ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रियंका दुपारी १२:४५ वाजताच्या सुमारास बाहेर गेली होती व रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी आली असता दोघांचा खून झाल्याचे तिच्या निदर्शनास आले. ते तिघेच या घरात राहत होते. चौथा कुणीही नसल्यामुळे या हत्येची गुंतागुंत वाढली होती. मात्र पोलिसांनी याची मोठ्या शिताफीने उकल केली. त्यांच्या खुणापूर्वी त्यांना झोपेच्या अथवा गुंगीच्या गोळ्या देण्यात आल्या असाव्या, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच दाम्पत्याचा खून केल्यानंतर घरातील रोख रक्कम लुटण्यात आल्याचा देखावा निर्माण करण्यात आला होता. मृतक शंकर चंपाती केंद्रीय विभागाच्या एका शाखेत काम करीत होते. या दोघांचे प्रेम संबंध या वृद्ध दाम्पत्यास मान्य नसावे किंवा त्यांच्यां प्रेमसबंधात ते अडसर ठरत असावे. शिवाय त्यांच्यांकडे असलेल्या प्रॉपर्टीच्या वाटणीतून या वृद्ध दाम्पत्याची हत्या झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. 

हा प्रकार निवडणुकीच्या दिवशी होणार होता. परंतु शेजारी घराबाहेर असल्यामुळे प्रकरण घडले नाही. वाडी पोलीस गुन्हे शाखेचे युनिट क्र.१ व युनिट क्र.४ यांनी या गुंतागुंतीच्या गुन्ह्याला छडा लावण्याची कामगिरी केली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.