पाटबंधारे विभाग नागपुर परिमंडळातील 'अनुकंपधारक' नौकरी पासून वंचीत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाटबंधारे विभाग नागपुर परिमंडळातील 'अनुकंपधारक' नौकरी पासून वंचीत

Share This
खबरकट्टा / नागपूर :

नागपूर पाटबंधारे परिमंडळ  नागपूर अंतर्गत येणारे नागपूर ,वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर ,भंडारा,गोंदिया  येणाऱ्या विभागात कार्यालयातील अनुकपधारकाची फार मोठी प्रतिक्षा यादी प्रलंबित असून दिवंगत कर्मचाऱ्याच्या मुलाला नातेवाईकाला नोकरी पासून वंचित राहून आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे ,नियमानुसार त्यांना नोकरी मिळणे अनिवार्य असून त्यांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे.
            

वर्धा पाटबंधारे विभाग हे अधीक्षक अभियंता नागपूर पाटबंधारे मंडळ नागपूर या विभागात येत असून तेथील वर्ग 'क' मध्ये येत असलेले अनुकंपधारकाना वर्ग 'ड'मध्ये नियुक्ती देण्यात आली आहे परिस्थिती मुळे अनुकम्पा धारकांना ते पण करावे लागले या विभागात पदे फार कमी प्रमाणात भरले जातात.

विशेष म्हणजे अनुकंपा प्रकरणे बाबत न्यायालयाचे निर्णय शासनाचे आदेश स्पष्ट असताना नोकरी व सेवा संबंधी मॅट कडे प्रकरणे येत असतात यावरून शासनाची कार्यशैली पारदर्शक नसल्याचे दिसून येते शासनाच्या विभागाचे हे वागणे बरोबर नाही अशा शब्दांत 'मॅट' आपली नारजगी व्यक्त केली आहे 
   
१९८९ ला सर्वोच्च न्यायालयाने सुषमा गोसेंन या प्रकरणात निर्णय देताना जागा उपलब्ध नसेल तर ती निर्माण करून अनुकम्पा नौकरी द्या असे स्पष्ट केले आहे या निर्णयाकडे 'मॅट' ने शासणाचे लक्ष वेधले आहे पात्र असूनही अनुकंपा नोकरी नाकारणे प्रलंबित ठेवणे ही बाब चुकीची आहे शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ आहे असे मनुन 'मॅट' ने ताशेरे ओढले आहे