ब्रेकींग न्युज : अखेर सुभाष धोटेंवर अˈट्रॉसटि दाखल : वक्तव्य भोवले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकींग न्युज : अखेर सुभाष धोटेंवर अˈट्रॉसटि दाखल : वक्तव्य भोवले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या आदिवासी वसतिगृह अत्याचार प्रकरणावर बेताल वक्तव्य संस्थाचालक व  काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना  चांगलेच भोवले असून  अॅट्रॅसिटी दाखल.
                  
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम -1989 अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करणेबाबत अर्जदार कमलेश महादेव आत्राम (वय 40), माता मंदिर वॉर्ड, चंद्रपूर यांनी सुभाष धोटे व इतर यांच्यावर  हॉटेल एनडी येथे पत्रकार परिषद घेऊन आदिवासी पालकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त आदिवासी बांधवांच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप ठेवत रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे आज दिनांक 24 एप्रिल 2019 रोजी रात्री  9 वाजता तक्रार नोंदविली होती.  


     
यावर रामनगर पोलिसांनी सुभाष धोटे व इतर अशा शब्दात तक्रार नमूद करून   अˈट्रॉसटि चा गुन्हा दाखल केला. परंतु सुभाष धोटे आणि इतर  असा शब्द वापरल्या मुळे  इतर नेमके कोण? ही बाब अजून उघडकीस आलेली नाही मात्र या तक्रारी मुळे माजी आमदार सुभाष धोटे मोठ्या अडचणीत आले असल्याचे दिसून येत आहे.