धोपटाळा शिवसेनेला खिंडार, शिवसेनेचे सरपंचपद धोक्यात : चार शिवसेना ग्रा. प. सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धोपटाळा शिवसेनेला खिंडार, शिवसेनेचे सरपंचपद धोक्यात : चार शिवसेना ग्रा. प. सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चेतन खोके : राजुरा )

राजुरा तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत धोपटाळा येथील शिवशेनेचे चार ग्रा. प. सदस्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेला रामराम करून काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.
 
                
स्थानिक धोपटाळा ग्रामपंचायत येथील शिवशेनेचे ग्रा. प. सदस्य डॉ. गणेश गेडाम, ब्रिजेश जंगीतवार, राजु पिंपळशेंडे, संगीता हिवराळे या चार सदस्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचा दुप्पटा देऊन प्रवेश देण्यात आला.
      
धोपटाळा येथील या चार ग्रा. प. सदस्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे येथील शिवशेनेचे सरपंचपद धोक्यात आले आहे. हे चारही सदस्य अन्य काही सदस्यांना सोबत घेऊन येथील सरपंचावर लवकरच अविश्वास ठराव दाखल करणार आहेत.

असे झाल्यास येथे सत्ताधारी शिवसेनेचे सरपंचपद जाऊन नवीन सदस्यांना संधी मिळू शकते. आता यापुढे येथे कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.