चिंचोली खुर्द येथे श्रीगरुदेव प्रचारक मेळावा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिंचोली खुर्द येथे श्रीगरुदेव प्रचारक मेळावा संपन्न

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर (चेतन खोके -राजुरा):

श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकरी चिंचोली खुर्द चे वतिने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सुवर्ण महोत्सवी ५० वी पुण्यतिथी निमित्ताने चिंचोली खुर्द येथे राजुरा तालुक्यातील श्री गुरुदेव प्रचारकांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बंडोपंत बोढेकर ग्रामगीताचार्य होते, उदघाटन रुपलाल कावळे जिल्हासेवाधिकारी चंद्रपूर यांनी केले. 


प्रमुख अतिथी म्हणून अँड.राजेंद्र जेनेकर केंद्रिय सदस्य प्रचार विभाग गुरुकुंज, अर्जुन पायपरे सरपंच,ॲड.सारीका जेनेकर, शैलेश कावळे, ज्ञानेश्वर लांडे, सौ.सुवर्णा कावळे, बळीराम बोबडे, जनार्दन हिंगाणे शाखाध्यक्ष आदींची उपस्थिती होती,प्रास्तविक चंपत कावडकर यांनी केले, यावेळी गावाच्या प्रवेशद्वारावर सेवा मंडळाचे स्वागत फलकाचे अनावरण रुपलाल कावळे यांचे हस्ते करण्यात आले, तालुक्यातील श्री गुरुदेव प्रचारकांनी सेवा मंडळाचे प्रचार व प्रसार कार्याबाबत विचार व्यक्त केले.ॲड.जेनेकर,कावळे, लांडे,जनार्धन हिंगाणे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.

श्री.रुपलाल कावळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्याचा अहवाल सादर करत पुढील काळात राबविण्यात येणारे उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच कार्यक्रमाध्यक्ष बंडोपंत बोढेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्य व विचारांचे सविस्तर विश्लेशन करत युवकांनी सेवा मंडळाचे प्रचारक म्हणून पुढे यावे, साहित्यात राष्ट्रसंतांनी युवकांना संबोधीत केलेले आहे असे विचार व्यक्त केले. सुत्रसंचलन व आभार विकास हिंगाणे यांनी केले.

मेळाव्यकरीता गावोगावचे प्रचारकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता सुरेश ताजने,बबन भगत,रामदास कावडकर,अमोल गारघाटे, निखिल हिंगाणे आदींनी अथक परिश्रम घेतले.