आसिफाबाद मार्गावरील शाळेजवळ पोलिसांना पाळत ठेवण्याची दामिनी पथकाची मागणी : मजनू व नशा विक्रेत्यांची रेलचेल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आसिफाबाद मार्गावरील शाळेजवळ पोलिसांना पाळत ठेवण्याची दामिनी पथकाची मागणी : मजनू व नशा विक्रेत्यांची रेलचेल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी- राजुरा):

संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या येथील एका खाजगी वसतिगृहातील अल्पवयीन मुलींचे लैंगिग शोषणाने समाजमन विचलित असताना आसिफाबाद मार्गावरील शाळा आणि महाविद्यालया जवळ शाळा-महाविद्यालय भरतांना आणि सुटतांना पोलीस शिपाई आणि महिला पोलीसांची निगराणी लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 
आसिफाबाद मार्गावर विविध शाळा, महाविद्यालय तसेच कम्युटर- कोचिंग क्लासेस आहेत त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच शाळकरी-महाविद्यालयीन मुलींची ये-जा असते. शाळा भरतांनी आणि सुटतांनी अवैध दारू व इतर नशेचे पदार्थ विकणारी मुले शाळेसमोर उभे राहून मुलां-मुलीकडे बघून हातवारे करीत असताना आढळतात असे तिथे ये जा असणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे.  

त्यात काही मुले मुलींना मोबाईल घेऊन देणे ते मॉल्स मध्ये घेऊन जाणे असे आमिष दाखवून मुलांकडे आकर्षिल्या जात असल्याच्या तक्रारीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अश्या प्रवृत्तीवर आळा बसावा याकरिता नागरिकांनी आसिफाबाद मार्गावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त लावण्या बरोबरच दामिनी पथकाची मागणी केली आहे.