स्वागत समारंभात आहेराची नवीन पद्धत : नवरदेवाने केली रक्त दानाची सुरुवात, पाहुण्यांनीही रक्तदान करून घडविला सामाजिक आदर्श - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्वागत समारंभात आहेराची नवीन पद्धत : नवरदेवाने केली रक्त दानाची सुरुवात, पाहुण्यांनीही रक्तदान करून घडविला सामाजिक आदर्श

Share This
-लग्न सोहळा स्वागत समारंभात रक्त दान शिबिराचे आयोजन
:नांदा येथील जमदाडे परिवरांचा आदर्श संदेश 

खबरकट्टा / कोरपना (गडचांदूर - नांदा ):

वनसडी: दुष्काळी परिस्थितीत परिवर्तनाच्या चळवळीला गती देणारा एक विवाह सोहळा स्वागत समारंभ नांदा या गावात पाहायला मिळाला. हा लग्न स्वागत समारंभ एक खास चर्चेचा विषय झालाय. कारणही तसेच आहे. 
सचिन व रिता या जोडप्याचं लग्न एकमेवाद्वीतीय ठरलंस ते वेगळ्याच कारणासाठी. माणुसकीचा संदेश देत, यांच्या लग्न स्वागत समारंभात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यातत आलं होतं.स्वत नवरदेव  रक्त दान करून शिबिराची सुरुवात केला यावेळी आलेल्या २३ मित्रमंडळींनी रक्तदान करुन जमदाडे कुटुंबीयांनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला.

लग्न म्हटले की, खर्चिक कार्यक्रमाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, भरमसाठ खर्च न करता समाजउपयोगी उपक्रम राबवून नवरदेव सचिन जमदाडे यांनी हा नवा पायंडा पाडला. लग्नसोहळा समारंभात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचा संदेश दिला या प्रेरणादायी आवाहनाचे सर्वत्र कौतुक झाले त्यांनी आपल्या विवाहप्रसंगी रक्तदान उपक्रम राबवून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला. सध्या या विवाह स्वागत समारंभाची सर्वत्र चर्चा होत आहे. 

नांदा  येथील मारोतराव मधुकर जमदाडे याचा चिरंजीव सचिन यांचा विवाह स्वागत समारंभ मुकुडबन येथील अनिलराव संभाजी कडुकर याची कन्या रिता हिच्याशी गुरुवार दि 25 एप्रिल रोजी नांदा येथे थाटामाटात झाला. राजकीय व इतर सर्वच क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला हजर होते.

                
उन्हाळ्यात शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत असतो त्या मुळे कित्येक रुग्णांना रक्त मिळत नसल्याने आपल्या विवाह सोहळ्यातील स्वागत समारंभात रक्त दान शिबिराचे आयोजन केले आणि इतरही लोकांनी असेच सामाजिक उपक्रम राबवावे असा संदेश या रक्तदान शिबिरातून दिला - रिता सचिन जमदाडे