सुभाष धोटे यांनी सादर केलाय अशोक चव्हानांकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सुभाष धोटे यांनी सादर केलाय अशोक चव्हानांकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राजुरा येथील आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात असंवेदनशील वक्तव्य करणारे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. बेताल वक्तव्यामुळे धोटे यांच्याविरोधात काल चंद्रपुरात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.


‘पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला तर सरकारकडून पैसे मिळतात आणि त्यामुळे आदिवासी मुली अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पुढे येत आहेत’ असे अत्यंत संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केले होते. या संतापजनक वक्तव्याचा आदिवासी समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला होता. त्यांना राज्य महिला आयोगाने देखील नोटीस बजावली आहे.