चिमूर नगरपरिषदेत रोडचे बाजूला गट्टू बांधकामात भ्रष्टाचार : अवघ्या आठवड्याभरात उखळलें निकृष्ट दर्जाचे काम ,लाखो रुपयांची उधळपट्टी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर नगरपरिषदेत रोडचे बाजूला गट्टू बांधकामात भ्रष्टाचार : अवघ्या आठवड्याभरात उखळलें निकृष्ट दर्जाचे काम ,लाखो रुपयांची उधळपट्टी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (चिमूर):

चिमूर नगरपालिकेच्या विविध प्रभागात रोडचे बाजूला गट्टू लावण्यात येत असून लावलेले गट्टू लगेच उखडून पडले असून निकृष्ठ दर्जाचे बांधकाम होत असून याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून कंत्राटदार चे चांगलेच फावले जात असून लाखो रुपयांची उधळपट्टी केल्या जात असून कोणीच काही म्हणत नाही असे नागरिकांचा सूर आहे.


चिमूर नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे मार्फत शहरातील व समाविष्ट गावांचे विविध प्रभागात रोडचे बाजूला पेव्हर ब्लॅक (गट्टू )मोठ्या प्रमाणात लावण्यात येत असून हे लावलेले गट्टू काही दिवसांत लगेच उखडून पडले असून त्या कामत निकृष्ठ दर्जाचे  साहित्य वापरून बांधकाम होत असून याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असून यामुळे कंत्राटदारचे चांगलेच फावले जात असून लाखो रुपयांची उधळपट्टी केल्या जात असून कोणीच काही म्हणत नाही असे नागरिकांचा सूर आहे .

असेच सोनेगाव बेगडे गावात पेवर ब्लॅक (गट्टू ) नुकतेच लावण्यात आले होते परंतु ते गट्टू  लगेच काही दिवसांनी उखडून पडले आहे त्यामुळे नागरिकांनी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला करता असा प्रश्न नागरिकांनी केला असून जर योग्य प्रकारे दर्जेदार कामे होत नसतांना नगरपरिषद प्रशासन व नगरसेवक करतात काय असा सवाल नागरीकडून विचारले जात आहे.

चिमूर नगरपरिषद वर कांग्रेसची सत्ता असून सदर गट्टू निर्मिती नेरी येथील कांग्रेसनेत्या चे कारखाना असून त्यांचे हितासाठी नगरपालिका गट्टू मोठ्याप्रमाणात लावून आपले नेत्याला व सत्तेतील लोकांना लाभ मिळविण्यासाठी हे जोरदार पण कमजोर बांधकाम सुरू असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे ।मात्र विरोधक मृग गिळून गप्प का असा सवाल सवॉल सामान्य माणसाला पडला आहे .