राजूरा अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनी अत्याचार प्रकरण :हायकोर्ट अपडेट - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजूरा अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनी अत्याचार प्रकरण :हायकोर्ट अपडेट

Share This
खबरकट्टा / नागपूर :

श्रमिक एल्गारच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठात राजूरा येथील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीच्या आईने रिट याचिका दाखल केली.  या याचिकेवर आज सुनावणी झाली.  सुनावणीत मा. उच्च न्यायालयाने आज खालीलप्रमाणे आदेश पारित केले.


6 पिडीत मुलींना अंतरिम भरपायी देण्यासाठी म्हणून प्रत्येकी 50 हजार रूपये आदिवासी विकास विभागाने अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश अंसारी मॅडम यांचे अध्यक्षतेखालील समितीकडे जमा करावे.

याचिकेत संस्थाचालक यांना प्रतिवादी करण्यांत यावे.

शाळा ताब्यात घेण्याबाबत मुख्य सचिव यांनी 25 तारखेला आपले शपथपत्र सादर करावे.

आजच्या सुनावणीत आपले म्हणणे सादर करतांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश यांनी आणखी 13 मुलीचे प्रकरण निदर्शनास आल्यांची माहीती देत, मुलींचे पालक मुलींची वैदयकीय तपासणीसाठी तयार नसल्यांचे सांगत, तपासासाठी मुदतवाढ मागीतली.

आज सुनावणीसाठी श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा ॲङ पारोमिता गोस्वामी, ॲङ कल्याणकुमार, श्रमिक एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम, आदिवासी विकास विभागाचे संयुक्त सचिव सुनिल पाटील आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी,  यांचेसह पिडीत मुलींचे पालक उपस्थित होते.