अखेर अल्पवयीन अत्याचार प्रकरण सि. आय. डी. कडे सुपूर्द : पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर अल्पवयीन अत्याचार प्रकरण सि. आय. डी. कडे सुपूर्द : पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि संतापजनक ठरलेल्या राजुरा येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वसतिगृहातील आदिवासी मुलींच्या घृणास्पद लैंगिक अत्याचार प्रकरणाची अखेर शासनाने दाखल घेत तीव्र जनभावनेचा सन्मान करत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सदर प्रकरण पोलिसांद्वारे योग्य प्रकारे हाताळल्या जात नसल्याचा सातत्याने आरोप होत होता तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांनी देखिल मुख्यमंत्र्यांकडे सि. आय. डी. चौकशीची मागणी लाऊन धरली होती

त्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालीद ह्यांनी आदेश निर्गमित करून पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना आजपर्यंतचा सर्व तपास व संबंधित कागदपत्रे  सि. आय. डी. ला सुपूर्द करण्याचा आदेश करून पुढील तपासाची सूत्रे हातात घेतल्याची घोषणा केली आहे.