आक्रोश मोर्चाने राजूरा शहर हादरले ,नागिरकांचा रोष : पोलीस प्रशासनाला नाइलाजस्तव करावा लागला लाठीचार्जे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आक्रोश मोर्चाने राजूरा शहर हादरले ,नागिरकांचा रोष : पोलीस प्रशासनाला नाइलाजस्तव करावा लागला लाठीचार्जे

Share This
खबरकट्टा  / चंद्रपूर :(राजुरा :मुख्य संपादक )

येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार संदर्भात अख्खा चंद्रपूर जिल्हा तापलेला असून अत्याचार संदर्भात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच संस्थापकांवर गुन्हे दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात याव्ही ह्यासाठी आज दिनांक 18 एप्रिल 2019 रोज गुरुवार ला आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असता ह्या मोर्चात  आदिवासी संघटना सोबतच इतर सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पुढारी सहभाग दर्शवत झालेया धक्कादायक प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.
    
आदिवासी जनतेचा आक्रोश मोर्चा ची सुरुवात पंचायत समिती ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा राजुरा इथून तीन नंबर नाका मार्गे शहरातून तहसील कार्यालयाला ठेपली असता ह्या आक्रोश मोर्चात हजारो नागरिकांचा अल्पवयीन पीडित मुलींना न्याय मिळवा ह्यासाठी सहभागी झाले होते. आक्रोश मोर्चाला पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त तैनात होता . त्याचबरोबर आक्रोश मोर्चा निमित्याने आज राजुरा शहर पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आले. मोर्चात सहभागी असलेल्या नागरिकांनी नारे बाजी करीत आपला रोष व्यक्त केला तर गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ' संस्थापकावर गुन्हा नोंद झालाच पाहिजे . अशी मागणी मोर्चात सहभागी असलेल्या नागरिकांनी उचलून धरली. मोर्चात जवळपास पंधरा हजार नागरिकांनी सहभाग घेतला  होता. 

इतक्या मोठय़ा नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा शांतपणे पार पडला मात्र मोर्चा संपल्या नंतर काही महिला वर्ग तसेच पुरुष मंडळी यांनी परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ' पंचायत समिती जवळ आपला ठिय्या मांडला व वाहतूक व्यवस्था काही वेळासाठी बंद करण्यात आली. ह्यावेळी ठिय्या मांडलेल्या महिला वर्ग सोबतच उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेल्या शाळेचे कर्मचारी वर्ग सोबतच संस्थापक कमेटी वर गुन्हा नोंद करून त्यांना फाशीची शिक्षा द्या. जोपर्यंत आरोपिंवर गुन्हा नोंद होनार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. अशी ठाम भूमिका ठिय्या मांडलेल्या महिलांसोबतच इतर नागरिकांनी घेतला. मात्र वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा व्हावा नाही म्हणून पोलीस प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत असतांना ठिय्या मांडलेल्या  महिलावर्गाला तसेच उपस्थित असलेल्या नागरिकांना ठिय्या उठवायला सांगितला असता . 


उपस्थित नागरिकांनी आपला रोष  वाढवण्यात व्यस्त असल्याने शेवटी पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज चे स्वरूप धारण करावे  लागले. त्यानंतर नागरिक इकडे तिकडे पसार झाली. मात्र मोर्चातील उपस्थित असलेया कोणत्याही नागरिकांवर कसलाही  गुन्हा नोंद झालेला नाही. 

मात्र ह्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसह  इतर आरोपींना प्रशासन कोणती आणि कधी शिक्षा देणार ह्याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले दिसून येत आहे.