आदिवासी अल्पवयीन अत्याचार प्रकरणात राजुरा येथील नगरसेवकांनी केली नगराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदिवासी अल्पवयीन अत्याचार प्रकरणात राजुरा येथील नगरसेवकांनी केली नगराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (राजुरा):

राजुरा येथे घडलेल्या आदिवासी अल्पवयीन अत्याचार प्रकरणाने जनमानस ढवळून निघाले असून शहरातील सर्व समाजातील भावना संतप्त होऊन रस्त्यावर प्रगट झाल्या. 


आतापर्यंत या प्रकणारात अटक करण्यात आलेले आरोपी फक्त एक टोक असून संस्थाचालकांच्या माहिती शिवाय इतका घृणास्पद प्रकार घडणे शक्य नाही याबाबत जनता ठाम असून त्यामुळे संस्थाध्यक्ष सुभाष धोटे व सचिव असलेले नगराध्यक्ष अरुण धोटे यांना अटक करून योग्य कारवाई केल्याशिवाय मुख्य आरोपी पर्यंत पोहोचणे शक्य नाही. 

या प्रकणातील संस्थेचे सचिव अरुण धोटे हे नगराध्यक्ष सारख्या घटनात्मक पदावर असल्याने शहरातील जनमानस अक्रोशीत आहे. बालिका अत्याचार प्रकरण हे शहराला लागलेला कलंक असून यामुळे राजुरा शहराचे नाव राज्य पातळीवर मालिन झाले असून जनतेला नगराध्यक्ष असलेल्या संस्था सचिवांच्या भूमिकेमुळे अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. 

सदर प्रकरणात संशयाची सुई नगराध्यक्षावर असल्यामुळे, त्यांनी नैतिक जबाबदारीतून राजीनामा देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी नैतिक जबाबदारी घेण्याचे टाळले परंतु  याबाबतची चौकशी प्रभावित होऊ नये या करिता त्यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे.  

याबाबत शहरवासीयांच्या तीव्र भावना लक्षात घेता आपण नगराध्यक्ष अरुण धोटे यांना राजीमाना देण्याची सूचना द्यावी अशी मागणी  भारतीय जनता पार्टी राजुरा च्या वतीने नगरपरिषदेतील सर्व भाजपा नगरसेवकांनी केली आहे.