खबरकट्टा / नागपूर :
मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठात सामाजिक कार्यकर्त्यांनी पिडीत मुलींच्या तीन आईने रिट याचिका दाखल केली.
ही याचिका न्यायमुर्ती झेङ ए. हक आणि न्यायमुर्ती विनय जोशी यांचे खंडपिठासमोर आज सुनावणीस आली.
6 एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर, 11 तारखेला एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआर उशीरा दाखल झाल्यानंतरही, तपास योग्यदिशेने होत नसल्यांचे दिसून आले, वैदयकीय तपासणीहीतही हलगर्जीपणा होत नसल्यांचे दिसून आल्यांने ही याचिका दाखल करण्यात आली.
ही याचिका आज तातडीने आणि गांभीर्याने दाखल करून घेत, याचिकेवर सुनावणी करीत एक्सपार्टी आदेश पारित केलेत.
संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यासाठी व याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी उच्च न्यायालयाने समिती गठीत केली आहे. सदर अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. अंसारी यांचे अध्यक्षतेखाली श्रीमती प्रभावती त्रंबक एकुरके , अेपीआय, वुमेन सेल चंद्रपूर, श्रीमती सिमा मनोहर गजभीये, तहसिलदार गोंडपिपरी, डॉ. दिप्ती श्रीरामे, मेडीकल कॉलेज चंद्रपूर, यांची समिती गठीत करण्यात आली व ही समिती आजपासून या प्रकरणात काम करेल.
समितीचे परवाणीशिवाय कुणीही बाहेरचा व्यक्ती शाळेच्या परिसरात जाणार नाही. शाळेचे पदाधिकारी व संस्थाचालक किंवा कोणत्याही इतर खाजगी व्यक्तींना शाळेच्या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
मेडिकल कॉलेजचे डिन यांनी पिडीतांना त्वरीत विनाविलंब सर्व प्रकारचे आरोग्याचे सुविधा उपलब्ध करून दयायचे आहे. तसेच आरोग्यासाठी येणारा संपूर्ण खर्च सरकार करेल.
जिल्हाधिकारी चंद्रपूर व पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांनी इंफट जेसिस इंग्लीश पब्लिक स्कूल तातडीने आपल्या ताब्यात घेतील.
चंद्रपूर जिल्हयाचे पोलिस अधिक्षक 22.5.2019 रोजी तपासणी बदल सविस्तर शपथपत्र सादर करतील.
हायकोर्टाने आदेश केलेल्या कमेटीला पिडीत मुलींच्या हितासाठी सर्व परिने पाउले उचलण्याचे मुभा देण्यात आली आहे. तसेच सदर समिती उच्च न्यायालयाकडे केव्हाही निर्देश इतर मार्गदर्शनासाठी अर्ज करू शकतील.
मा. उच्च न्यायालयाने असेही नमुद केले की, साधारणता ते पहिल्याच सुनावणीत असे आदेश पारित करीत नाहीत, मात्र या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता एक्सपार्टी आदेश पारित करीत आहेत.
याचिकाकर्त्याचे वतीने ॲङ. एफ. टी. मिश्रा यांनी तर सरकारचे वतीने टि. ए. मिश्रा यांनी काम पाहिले.
याचिकाकर्त्या आई आज सुनावणीचे वेळी उच्च न्यायालयात उपस्थित होत्या.