आक्रोश जनतेचा :पाठिंबा आमचा - समस्त शिवसैनिकांतर्फे आक्रोश मोर्चाला जाहीर पाठिंबा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आक्रोश जनतेचा :पाठिंबा आमचा - समस्त शिवसैनिकांतर्फे आक्रोश मोर्चाला जाहीर पाठिंबा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : आक्रोश जनतेचा :पाठिंबा आमचा 

दि. 18/04/2018ला होणारया आक्रोश मोर्चा ला शिवसेना चंद्रपूर जिल्हा व राजूरा विधानसभा  च्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात येत असुन,पिडीत परिवाराला न्याय मिळवून देयी पर्यंत शिवसेनेचे  संपूर्ण पदाधिकारी  आदिवाशी जनतेच्या व पिडीत परिवाराच्या पाठीशी राहिल असे शिवसेना चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख सावंत साहेब, जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, माजी नगरसेवक बंडू हजारे  व राजुरा तालुका प्रमुख विग्नोज राजूरकर सहित समस्त शिवसैनिकांचा पाठिंबा जाहीर करण्यात आला असून सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उद्या दुपारी 12वाजता आंबेडकर पुतळा, राजुरा येथे उपस्थित रहावे असे शहर प्रमुख  भूमन सल्लम यांनी कळवले आहे.
               
शहरातील नामांकित दर्जाच्या शाळेत घडलेली ही घटना अतिशय घुणास्पद असून सादर घटनेची माहिती भेटताच आम्ही चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पालकांची विचारपूस केली व त्यांना योग्य न्याय मिळावा त्या साठी तुमच्या पाठीशी खंभीर उभे राहू असा धीर दिला. अपराध्यांना गजाआड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही -भूमन सल्लम, शहर प्रमुख शिवसेना