नामांकित शाळा इण्फण्ट जीजस मधे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्त्याचर : संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नामांकित शाळा इण्फण्ट जीजस मधे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्त्याचर : संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राजुरा येथील इण्फण्ट जीजस या नामांकित शाळेमधे आदिवासी समाजाचे जवळपास 300 मुले मुली इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतं आहे. त्या शाळेत आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह चालविले जात असून दुर्गम व ग्रामीण परिसरातील मुलांना शासनातर्फे इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाद्वारे नामांकित शाळेची मान्यता देवून प्रत्तेक विद्यार्थ्यामागे शासन दरवर्षी हजारो रुपये संस्थाचालकांना देत असते.

मात्र मागील अनेक वर्षापासून इण्फण्ट जीजस या नामांकित शाळेत अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्त्याचार होतं असल्याचा धक्कादायक प्रकार होतं असल्याच्या चर्चा होत्या. मात्र दिनांक 6 एप्रिलला अचानक जवळपास 13 मुलींची प्रक्रुती बिघडल्याने त्यांना राजुरा येथील रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन मुलींची प्रक्रुती जास्त बिघडल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.

या दरम्यान मुलीना नेमक काय झालं याचा छडा लागत नसल्याने डॉक्टरांनी त्या मुलींची सम्पूर्ण चाचणी केली असता त्यांच्यावर अत्त्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले. या प्रकरणात शाळेच्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून राजुरा पोलीस स्टेशन येथे कलम 376 (अ)(ब) पॉस्को व अक्ट्रसिटि अँक्ट अंतर्गत अद्न्यात व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल झाले. 

या प्रकरणात संस्थाचालक हे तेवढेच दोषी असून त्यांचेवर सुद्धा गुन्हा दाखल करा. त्या शाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करा आणि त्या शाळेची नामांकित शाळा म्हणून मान्यता आहे ती रद्द करा अशा प्रकारची मागणी मनसेचे राजू कुकडे व सामाजिक कार्यकर्ता गोमती पाचभाई व स्वाती देवाळकर यांनी पत्रकार परिषद घेवून  व जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देवून केली आहे. या प्रसंगी मनसेच्या कविता घोणमोडे, सुमन चामलाटे, पीयूष धूपे. रमेश कालबान्धे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.