कोडशी बु. येथे ग्रामजयंती निमित्ताने आदर्श सामुहिक विवाह सोहळा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोडशी बु. येथे ग्रामजयंती निमित्ताने आदर्श सामुहिक विवाह सोहळा संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
             
श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकरी मंडळी कोडशी बुज.यांचे वतिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रामजयंती महोत्सव तथा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आदर्श सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाध्यक्ष म्हणून मा.लक्ष्मनराव गमे उपसर्वाधिकारी अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.रुपलाल कावळे जिल्हासेवाधिकारी, अँड.राजेंद्र जेनेकर केंद्रिय सदस्य श्री गुरुदेव प्रचार विभाग, सोपान नागरगोजे,अरुण पा.नवले,श्रीमती केराम सरपंच, बंडु वासेकर उपसरपंच,पांडुरंग जरीले पोलीस पाटिल, देविदास हंसकर ग्रामसेवाधिकारी,खुशालराव गोहोकर, हुसेन किन्नाके, विठ्ठलराव डाखरे, बापुजी पिंपळकर,रंगलाल पवार,तावीडे,आस्वले आदी प्रचारक मंडळींची उपस्थिती होती. 

याप्रसंगी श्री.सचिन वासेकर चे लग्न कु.निशा देवतळे हिचेसोबत, श्री.अमोल वासेकर चे कु.शिल्पा शिंगाडे हिचे सोबत, श्री.संदिप सिडाम चे कु.निलिमा मेश्राम हिचे सोबत, श्री.सचिन भोयर चे कु.मंगला विधाते हिचे सोबत तर श्री.अजय नांदेकर चे कु.प्रतिक्षा तुराणकर हिचे सोबत व इतर दोन नववधु-वर अशा सात वेगवेगळ्या समाजातील मुला-मुलींचे लग्न सामुहिक पद्धतीने करण्यात आले,सर्व नवविवाहितांना पाहुण्यांचे वतिने ग्रामगीता ग्रंथ भेट करण्यात आला. 

कार्यक्रमाध्यक्ष लक्ष्मनराव गमे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विवाह विषयक विचार व माहिती समजावून सांगत अंदाजे पस्तीस लाख रुपयांचा खर्च वाचवलेला आहे,आजच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या सामुहिक विवाह सोहळ्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले, प्रा.रुपलाल कावळे, अँड.राजेद्र जेनेकर, सोपान नागरगोजे,अरुण नवले, डाखरे,गोहोकर,आस्वले आदींनी समयोचित विचार व्यक्त केले. प्रास्तविक मारोती सातपुते ग्रामगीताचार्य, सुत्रसंचलन हिगोले सर तर आभारप्रदर्शन शिवाजी वासेकर यांनी केले. किन्नाके महाराज यांनी काल्याचे किर्तन केले. उपस्थितांचे भोजनाची व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.ह्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.