मांगलगाव येथील नागरिकांनी दिले विहरित पडलेल्या बिबटच्या बछड्याला जीवनदान - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मांगलगाव येथील नागरिकांनी दिले विहरित पडलेल्या बिबटच्या बछड्याला जीवनदान

Share This
खबरकट्टा /(चिमूर:-अरविंद राऊत):  
शंकरपुर येथून जवळच असलेल्या मांगलगाव येथे अरविंद घानोडे यांचे शेतातील विहरित बिबट जातीच्या बछडा  पडलेल्या अवस्थेत दिसताच अरविंद घानोडे यांनी मांगलगाव येथील उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कोलते यांना माहिती देताच त्यांनी गावातील नागरिक घेऊन शेतातील विहिरीकडे घेऊन गेले व विहरित मधे पडलेल्या बछड्याला बाहेर काढले.


      
आत मधे पडलेल्या बछड्याला  इजा होणार नाही याची दखल घेत गावकऱ्यांनी त्याला सुख रूप बाहेर काढून गावात आणले प्रफुल कोलते यांनी चिमूरचे आर.एफ.ओ. चिवांडे यांना मोबाईलद्वारे या घटनेची माहीती देताच अधिकारी मांगलगाव येथे पोहोचले गावकरी लोकांनी बिबट बछडा  सुख रूप फॉरेस्ट अधिकारी यांच्या हवाली केल्याने त्यांनी गावकरी लोकांचे आभार व्यक्त केले.
   
या वेळी उपसरपंच प्रफुल कोलते,अरविंद घानोडे, बिरबल खडसंग, बंडू खोब्रागडे, व गावातील नागरिक उपस्थित होते.