ब्रेकिंग न्यूज :राजुरा शहरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार :पॉक्सो गुन्हा दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज :राजुरा शहरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार :पॉक्सो गुन्हा दाखल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :(मुख्य संपादक)-

राजुरा शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आदिवासी वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 


सविस्तर वृत्त असे की या नामांकित शाळेत आदिवासी मुलाचे वसतिगृह असून संपूर्ण जिल्ह्यातील अनेक आदिवासी मुले - मुली वास्तव्यास आहे. याच वसतिगृहातील दोन मुलींवर (एक 9वर्षीय, दुसरी 11 वर्षीय )शारीरिक अत्याचार झाल्याचा, पोक्सो कायदा(POCSO ACT) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ याअंतर्गत राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून अतिशय संवेदनशीलपने प्रकरण हाताळण्यात येत आहे. 

पीडितांना जिल्हा सामान्य रुग्णालयात 6एप्रिल 2019ला दाखल करण्यात आले होते.त्यानंतर वैद्यकीय तपासणीत उघड झाल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक विशेष तपास करीत असून वृत्त लिहेपर्यंत सदर शाळेतील वसतिगृह  अधीक्षक  एक पुरुष व महिला अश्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून अतिशय गुप्ततेत कसून चौकशी करण्यात येत आहे.

सदर शाळेचे संस्थाचालक हे राजकीय व्यक्ती असून,राजकीय दबावापोटी अश्या घटनां दबल्या जाऊ नये व आम्हाला योग्य न्याय देण्यात यावा अशी याचना पीडितांच्या कुटुंबीयांनी खबरकट्टा प्रतिनिधी शी बोलताना केली आहे .