धक्कादायक : गोंडपिपरी वनपरिक्षेत्रात वाघाचा हल्ला : छिन्नविछिन्न अवस्थेत शरीर आढळले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक : गोंडपिपरी वनपरिक्षेत्रात वाघाचा हल्ला : छिन्नविछिन्न अवस्थेत शरीर आढळले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर (गोंडपिपरी -तोहोगाव प्रतिनिधी ):

गोंडपिपरी वनपरिक्षेत्रातील परसोडी बिट क्र 533 परिसरात नंदकिशोर मारोती बोबडे (वय-40 )परसोडी येथील  रहिवाशी यांच्यावर वाघांनी हला करून ठार केले.

घटनास्थळी त्यांचे छिन्नविछिन्न  शरीर आढळले असून,  वाघांनी खाल्ले असल्याचा अंदाज आहे.  मोहफुल वाचण्यासाठी जंगलात गेला होता ही घटना शुक्रवार ची आहे घरच्यांनी त्याचा शोध घेतला शोध लागला नव्हता आज सकाळी त्याचे पाय व टॉवेल घटनास्थळी दिसले. 

घटनास्थळी कोठारी पोलीस स्टेशन चे ठाणेदार संतोष अंबिके यांच्या उपस्थितीत मोका पंचनामा सुरू असून वन विभागाचे कुणीही अधिकारी पोहोचले नसून वनपाल दिलीप लोणारे व वनरक्षक घरोटे  हे नेहमीप्रमाणे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.